चोरीच्या दुचाकी विक्री करणारे रॅकेटचा पर्दाफाश
यवतमाळ :- मुंबई, ठाणे यासारख्या महानगरातून चोरी केलेल्या दुचाकींची विक्री करणारे रँकेट पोलिसांच्या हाती लागले आहे. सदर चोरीच्या दुचाकी विकताना पुसद येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाला अटक केली आहे. त्याच्या जवळून ७ लाख १४ हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी पोलिसांनी अप्त केलाय.झटपट श्रीमंत होण्यासाठी चोरीसाखे गुन्हे केले जातात एका ठिकाणच्या दुचाकी आणून बेमालूमपणे विकणे अशा बाबती बुद्धी लावण्यापेक्षा ती चांगल्या करणी लावली तर त्यांचं भविष्य उज्ज्वल असेल यात शन्का नाही .
मुंबई, ठाणे यासारख्या महानगरातून दुचाकी चोरी करायच्या व त्या इकडे विदर्भात आणून विकायच्या अशा चोरी केलेल्या दुचाकींची विक्री करणारे रँकेट पोलिसांच्या हाती लागले आहे. पुसद येथील प्रमोद पवार याने काही दिवसांपूर्वी पुसद बसस्थानकातून दुचाकी चोरली होती. तो ही चोरीची दुचाकी सध्या वापरत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून प्रमोद पवार याचे धरी जाऊन प्रमोदला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या घराच्या आडोशाला ४ दुचाकी आढळून आल्या. या दुचाकी योगेश वसंत पाचपिले रा, नालासोपारा ठाणे मुंबई, याच्याकडून विक्री करण्यासाठी गावी आणल्याचे सांगितले. सदर दुचाकी ह्या चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाल्याने. पोलिसांनी दुचाकीसह चोरट्यास अटक केली आहे. . त्याच्या जवळून ७ लाख १४ हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी पोलिसांनी जप्त केलाय.