दारापुर येथील खड्डे बुजवण्यात मजीप्राची कुचराई

दारापूर :- दारापूर ते नावेड मुख्य मार्गावरील बौद्ध विहार जवळील रस्त्यावर विश्वराज कंपनीने महाराष्ट्र जीवन प्राधिकार्यांची पाईपलाईनचे काम केले, गेल्या चार ते पाच दिवसापासून खड्डा बुजविला नसल्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना तारेची कसरत करावी लागत आहे.जो खड्डा बुजवला तो अशाप्रकारे बुजवलंय कि केव्हाही वाहन त्यात पडेल अशी स्थिती आहे .
गेल्या काही दिवसांपूर्वीच विश्वराज या कंपनीने दारापूर गावातील नवीन पाईपलाईन चे काम करण्याकरिता मुख्य सिमेंट काँक्रेट रस्ते फोडले मात्र रस्ते थातूरमातूर पद्धतीने जोडल्या चा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित कंपनीचा ठेकेदाराने या कामांमध्ये लक्ष देऊन सिमेंट काँक्रीटेकरांचे रस्ते फोडल्यानंतर व्यवस्थित दुरुस्त करण्यात यावे या मार्गावरील खड्डा त्वरित बुजवण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत, पाइपलाइनसाठी खोदकाम केलं परंतु खड्डे व्यवस्थित रस्त्याच्या समांतर केले नाहीत जे बुजवले ते इतके थातुर मातुर कि त्यामध्ये केव्हाही वाहन पडेल कि काय अशी भीती नागरिकांना वाटतेय .
पाइपलाइनमध्ये बिघाड झाला तर तो लवकर दुरुस्त होत नाही झाला तर खड्डे नीट बुजवले जात नाही असा अनागोंदी कारभार अनेक विभागांचा आहे आता दारापुरमधील या रस्त्यावर अपघात घडला तर जबाबदारी कोणाची