पोलीस स्टेशन गाडगेनगर हद्दीत घातक शस्त्रासह आरोपी पकडलेबाबत..
अमरावती :- दि. 20/12/2024 रोजी पोलीस स्टेशन गाडगेनगर हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच तडीपार आरोपी चेक करण्याकरिता स्पेशल स्कॉड हा पोलीस स्टेशन गाडगेनगर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना आम्हाला गुप्तबातमीदार कडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार इसम हा जयसियाराम नगर चौकात हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करीत आहे. असे खात्रीलायक माहितीवरून आम्ही जयसियाराम चौक, अमरावती येथे जाऊन सदर रेकॉर्डवरील गुन्हेगार यास पोलीस स्टाप चे मदतीने लोखंडी धारदार चाकू सह ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्यास त्याचे नाव, गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव आशिष उर्फ छोटा जंगली साहबसिंग सागर वय 20 वर्ष, रा. सरकारी दवाखाना जवळ, विलासनगर, अमरावती असे सांगितले. त्यास ताब्यात घेऊन त्याचे वर पोलीस स्टेशन गाडगेनगर, अमरावती (शहर) येथे कलम 4, 25 आर्म ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली.
सदरची कार्यवाही मा. श्री नविनचंद्र रेड्डी पोलीस आयुक्त, अमरावती (शहर), श्री सागर पाटील पोलीस उप-आयुक्त परि-1 अम., श्री. गणेश शिंदे पोलीस उप-आयुक्त परि-2 अम., तसेच श्रीमती कल्पना बारवकर पोलीस उप-आयुक्त, (मुख्यालय) तथा गुन्हे शाखा प्रभारी, श्री शिवाजी बचाटे सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनात स्पेशल स्कॉड प्रभारी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, पो.हे.कॉ. इशय खांडे, छोटेलाल यादव, मंगेश लोखंडे, पोलीस अंमलदार आशिष डवले, रंजित गावंडे, अमोल मनोहर, निवृत्ती काकड यांनी सदरची कारवाई केली.