LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

महाराष्ट्रात येणार 303 मोठे प्रकल्प2 लाख 1300 हजार रोजगार निर्मितीउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणादिलेली आश्वासनं पाच वर्षात पूर्ण करु

येत्या काही वर्षात 2 लाख 1300 हजार जणांना रोजगार मिळणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेमध्ये बोलताना केली. 1 जुले 2022 पासून महाराष्ट्रा 221 विशाल आणि अतिविशाल प्रकल्प सुरु आहेत. यात 3 लाख 48 हजार कोटी गुंतववणूक करण्यात आली आहे. यासह 303 प्रकल्पांचा विकास करण्यात येतोय. त्यापैकी 95 प्रकल्प सुरु झालेत. विदर्भ तसेच मराठवाड्यात अनेक बडे उद्योजक गुंकवणूक करणार आहेत. 2022 ते 2024 या वर्षात महाराष्ट्रात 2 लाख 44 हजार कोटींची परकीय गुंतवणूक झालेली आहे. आपल्या राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात गेल्याचा आरोप विरोधक करतात. त्यांनी ही आकडेवारी पहावी असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

महाविकास आघाडीचे गृहमंत्री वलसुलीच्या आरोपाखाली जेलमध्ये गेलेत. पोलिस आणि उद्योगपतींच्या घराबाहेर बॉम्ब लावले. आता कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाने गळा काढताता. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात पोलिस यंत्रणेचा गैरवापर केला गेला. मला आणि देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलिसांना हाताशी घेऊन कट रचले. महाविकास आघाडीला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. पेनड्राईव्हमध्ये सर्व पुरावे आहेत. गुन्हेगारांना अभय दिला जाणार नाही. सभागृहात बोलण्यापेक्षा अनेकांना मिडियाच्या कॅमेऱ्यावर बोलायला आवडते. सभागृह मनोरंजनाचा कट्टा नाही. जनतेने आपल्यायला निवडणून पाठवले आहे. यामुळे सभागृहाचे कामकाज गांभीर्याने घेतले पाहिजे. नागपूरमध्ये लंडनसारखे वातावरण असते. अनेक जण पर्यटनासाठी येथे येतात. पर्यटन करतात आणि निघून जातात.

लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची जबाबादारी आमची आहे. लाडकी बहिण सुरक्षा योजना आम्ही आणली आहे. बदलापूरच्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याने पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांची बंदूक खेळणं वाटते का? बदलापूरची घटना घडल्यानंतर रेल्वे रोखून आंदोलन केले. जेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला आणि पोलिसांनी त्याला संपवलं, त्यावेळी हे आरोपीच्या बाजूने उभे राहिले. पीडित मुलीच्या नावाने राजकारण केले. यानंतर आरोपीच्या नावाने गळा काढला. विरोधकांची दुटप्पी भूमिका चुकीची आहे. लहान मुलींवर लैंगिक अत्याचार उघडकीस येण्याचे प्रकार वाढले आहे. इतकचं नाही तर महाराष्ट्र गुन्हेगारीत आघाडीवर आहे. हे राज्यासाठी चांगले नाही. पण, चुकीला माफी नाही. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सोडणार नाही. बीडच्या प्रकरणात कारावई झालेली आहे. स्वार्थी राजकाराणासाठी समाजात तेढ निर्माण केले जात आहे. असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!