मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात विरोधकांवर साधला नेम

नागपूर :- नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. मराठवाडा आणि विदर्भाच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी अद्याप खाते वाटप जाहीर झालेले नाही. यामुळे या मुद्द्यावर देखील विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका केली. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीने बनावट औषध विरोधात आंदोलन केले आहे. राज्यात अनेक ठिकाणी बोगस औषधांचा साठा सापडला या विरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला.
आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, आज अनेक मुद्दे सभागृहात मांडले गेले. सगळ्या मुद्द्यांना एका उत्तरात देणं शक्य नाही पण धोरणात्मक बाबींवर मी बोलणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सभागृहात बोलताना म्हणाले, . नागपूरचं अधिवेशन हे अंतरिम असं अधिवेशन असतं. या अधिवेशनात प्रश्नोत्तरं ठेवत नाही. या अधिवेशनात पुरवणी मागण्या आल्या पाहिजेत हे आपलं सरकार म्हणून धोरण असतं. सात दिवस अधिवेशन सुरु होतं. बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली. आमच्यासाठी हे सरकार नव्याने आलं असलं तरीही मागच्या अडीच वर्षांच्या कामात केलेलं कंटीन्यूएशन आहे. मागच्या सरकारची कामं गतीने आम्ही पुढे नेत आहोत. आमच्या जबाबदाऱ्या बदलल्या आहेत. एकनाथ शिंदे तेव्हा मुख्यमंत्री होते, आता मी मुख्यमंत्री आहे. मात्र जबाबदाऱ्यांपेक्षा सामूहिकदृष्ट्या आम्ही जे निर्णय अडीच वर्षांत घेतले, ज्या योजना हाती घेतल्या त्यादृष्टीने आम्ही सरकारचं कामकाज सुरु केलं आहे. असंही मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले.. माझा नेहमी प्रयत्न असतो की जे तिकडच्या बाकांवर बसून जे बोलतत ते इकडे आल्यानंतर पूर्ण केलं पाहिजे. मी जयंत पाटील यांचे आभार मानतो. कारण त्यांनी महत्त्वाचे मुद्दे आठवण करुन दिले. २०१९ मध्ये सरकार आमचं आलं होतं. काही कारणाने तुम्ही सरकार केलं. जाहीरनाम्याचा विचार करायचा तो तुमच्या जाहीरनाम्याचा करावा लागेल, देवेंद्र फडणवीस यांनी यानंतर विधानसभेत नदीजोड प्रकल्पाची आणि इतर विदर्भातील प्रकल्पांची माहिती दिली.