राष्ट्रसंतांना पुण्यतिथीनिमीत्य धरणात अभिवादन

धारणी :- मनि नाही भाव म्हणे देवा मला पाव असं माणसाच्या मानसिकतेचं यथार्थ वर्णन करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी धरणीमध्ये मिथ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. त्यानिमित्य गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली.
धारणी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर हरीहर नगर येथूनगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. आदिवासी नृत्य करणाऱ्या महिलां शोभायात्रेत होत्या. ट्रॅक्टर ट्राली मध्ये भजन कीर्तन,करणारी मंडळी होती. रथामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मोठी प्रतिमा विराजमान होती.या वेळी शेकडो विद्यार्थी व शिक्षक नागरीकशोभायात्रेत सहभागी झाले. खंजरीच्या आवाजाने संपूर्ण धारणी नगरी दुमदुमली. हरीहर नगर ते बस स्टॉप पर्यंत आकर्षक शोभायात्रा रैली काढण्यात आली तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा चे विद्यार्थी तसेच संत गाडगे महाराज आदीवासी आश्रम शाळा ढाखरमाल, गुरुदेव सेवा मंडळ सर्व शाखा धारणी चे सर्वच कार्यकर्ते, विठ्ठल रखुमाई भजन मंडळ, हनुमान मंडळ धारणी, गजानन महाराज भजन मंडळ धारणी, आदींचा समावेश होता
तसेच या कार्यक्रमाला उपस्थित रविदास मानव, राष्ट्रीय व्याख्याते, प्रमोद बैस, आकाशवाणी गायक नागपूर, लक्षमनदास काळे महाराज, राष्ट्रीय कीर्तनकार, सत्यपाल महाराजांचे शिष्य संदीप पाल सप्तखंजेरीवादक योनोरकर, श्री खंडे आदी उपस्थित होते
धारणी ऐथील ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक झाल्टे बिट जमादार वसंत चव्हाण,मोहीत आकाशे, सह पोलीस कर्मचारी यांनी शांतता मय वातावरणात भव्य शोभायात्रा शांततेत पार पडली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजनी समाज प्रबोधन आपल्या बनातून व ग्रामगीतेतून केलं आहे त्याचं महत्वपूर्ण कार्य म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात असलेलं त्याचं योगदान. आणि त्या योगदानामुळेच त्यांना राष्ट्रसंत असं सम्बोधलं जात. फार आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सिटी न्यूज परिवाराच्या वतीने शत शत नमन