क्षुल्लक कारणावरून सेवानिवृत्त पोलिसांच्या मुलाचं अपहरण

अमरावती :- रवी नगर परिसरातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाला घरातून उचलून नेऊन गाडी टाकून नेऊन मारहाण. केली. अशी तक्रार मुलाच्या आईने राजापेठ पोलिसांकडे केली. या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करून ७ आरोपीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल.केले व दोन आरोपीना अटक केलीय .
रवी नगर येथील एका महिलेने आपल्या मुलाचं अपहरण केल्याची तक्रार राजापेठ पोलिसांकडे केली. या मुलाचे वडील सेवानिवृत्त पोलीस आहेत मुलाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करून दोन आरोपीना अटक केली आहे. भूपेंद्र उर्फ बप्पी प्रमसिंग ठाकूर व दुसरा २ मयूर अनिल गुज्जर रा. भुतेश्वर प्लॉट या दोघांना अटक करू 140, 309.4, 189.2, 189.4, 190, 351.3 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
शुल्लक गोष्टींवरून मॊमॊठे गुन्हे घडत असल्याचं समोर येत आहे या प्रकरणात आरोपीचा पुतण्या व अपहृत मुलगा यांचा वाद झाला होता तेवढ्यावरून मुलाच्या काकाने शिवीगाळ करून त्या सेवानिवृत्त पोलिसांच्या मुलाचं अपहरण केलं. सहनशीलता, समजूतदारपणा या गोष्टी कालबाह्य होत असल्याचं निदर्शनास येतंय.