गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याचा बौद्ध महासभेनं केला निषेध

अमरावती :- गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत अमित शहांनी राजीनामा द्यावा शी मागणी बौद्ध महासभेने केली आहे. सोमवार 23 डिसेंबर रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी परिसरामध्ये निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल.
गृह मंत्री अमित शहा यांनी राजीनामा देण्याची मागणी बौद्ध महासभेने केली आहे. आपल्या मागणीसाठी बौद्ध महासभेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केले अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी भारतीय बौद्ध महासभेने मागणी केली. लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करण्यात यावी अन्यथा लवकरच संपूर्ण आंबेडकरी संघटना रस्त्यावर उतरतील असा भारतीय बौद्ध महासभेचा इशाराआहे.
गृहमंत्र्यांनी केलेल्या वक्त्यव्यामुळे देशभरात आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत आंदोलनामागून आंदोलनं करण्यात येत आहेत. आधी परभणी येथील अवमानना प्रकरण व त्यानंतर अमित शहा यांनी केलेलं वक्त्यव्य यावरून वादळ उठलं आहे.