नाताळ उत्सवाला दोन दिवस शिल्लक, क्रिस्त बांधवानी केली जय्यत तयारी
ज्ञानमाता हायस्कूल, अमरावती :- ख्रिस्ती बांधवांचा सण नाताळ अर्थात ख्रिसमसच्या सेलिब्रेशनला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. नाताळचा उत्सव जगभरात जोशात साजरा केला जातो. जगातील सर्व चर्च या दिवशी सजवले जातात. ख्रिसमसच्या दिवशी लोक एकमेकांना भेटतात आणि शुभेच्छांसह छान छान भेटवस्तू देतात. लहानांपासून मोठ्यांना देखील आकर्षित करते ती म्हणजे ‘ख्रिसमस ट्री’.एक सुंदर झाड, ज्यावर छान छान भेटवस्तू ठेवलेल्या असतात. लोक या ख्रिसमस ट्रीला अतिशय सुंदर आणि आकर्षक पद्धतीने सजवतात. शहरातील ज्ञा्नमाता शाळेत शिक्षक विद्यार्थी या उत्सवाच्या जय्यत तयारी ला लागले आहे.अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत सुंदर वेगवेगळ्या प्रकारांचे क्रिस्तमस ट्री बनून आणल्या आहे.. तर सुंदर गोशाळा सुद्धा प्रदर्शनीत लावण्यात आल्या.शाळेत सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे आकाश दिवे सह रांगोळी काढण्यात आली आहे.तर शाळेच्या प्रांगणात भव्य गोशाळा काढण्याच्या तयारीला लागलेले आहे.येणाऱ्या 24डिसेंबर च्या रात्री आणि 25 डिसेंबर ला सकाळी ज्ञानमाता शाळेच्या परिसरात नाताळ उत्सवाचा जल्लोष साजरा केला जाणार आहे.