वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

हरियाणा :- एक धक्कादायक प्रकार पुढे येताना दिसतोय. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली असून शहरात भीतीचे वातावरण बघायला मिळतंय. एकीकडे बर्थडे पार्टी सुरू होती. सर्वजण आपल्या आनंदात होते. मात्र, पुढे जे काही घडले त्याचा विचारही साधा कोणी केला नसावा. चक्क बर्थडे पार्टी सुरू असताना गोळीबार करण्यात आला. त्यापेक्षाही हैराण करणारे म्हणजे या गोळीबारात तब्बल 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमींना रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय.
बर्थडे पार्टी सुरू असताना अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. गोळीबार करून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांकडून आता आरोपीचा शोध घेतला जातोय. या गोळीबारातील मृतांमध्ये दोन तरूण आणि एका तरूणीचा देखील समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही गोळीबाराची घटना रात्री दोनच्या दरम्यानची आहे. हरियाणा पंचकूला येथील पिंजाैर हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे.
गोळीबारात मृत पावलेल्यांची नावे विनीत, विक्की आणि मुलीचे नाव निया असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीये. हे सर्वजण हिसारचे. रहिवासी असून ते बर्थडेसाठी पंचकूलामध्ये आल्याची माहिती मिळतंय. हा गोळीबार नेमका का करण्यात आला, याचा शोध पोलिस घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार गॅंगवॉरच्या माध्यमातून हा गोळीबार करण्यात आला असावा.
या गोळीबारानंतर शहरात विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण बघायला मिळतंय. मृतांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील कुटुंबियांकडून केली जात आहे. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिस घटनास्थळीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना दिसत आहेत. किती आरोपींकडून हा गोळीबार करण्यात आला, याची माहिती अजून मिळू शकली नाहीये.