शरद पवारांचं कौतुक, अजितदादांवर हल्लाबोल ; छगन भुजबळांची पुढील भूमिका ठरली ?, सगळं सांगितलं !

मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ते कमालीचे नाराज झाले आहेत. छगन भुजबळ सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधताय. मुंबईमध्ये रविवारी 22 डिसेंबर ओबीसी बहुजन आघाडीची बैठक झाली. या बैठकीत छगन भुजबळांना पाठिंबा देण्याचा निर्धार ओबीसी नेत्यांनी केला. या बैठकीनंतर छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
वेगवेगळ्या ओबीसी संघटना ज्या आहेत, त्यांची इथे समोर बैठक झाली. त्यांनी सांगितले आम्हाला भेटायचे आहे, त्यांनी त्यांची मतं मांडली. तुम्ही ओबीसींचा आवाज उठवणारे आहात. राज्यात, विधानसभेत, तुम्हाला बाहेर ठेवलं, यात काहीतरी गौडबंगाल आहे. आम्हाला भीती वाटतेय. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आम्ही राज्यभर हा प्रश्न घेऊन जाऊ आणि जागरूकता करू, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी या बैठकीत मांडली.
छगन भुजबळ काय म्हणाले ?
नवीन लोकांना संधी द्यायला हवी, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. यावर देखील छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. चांगली गोष्ट आहे, पण हे ठरवलं पाहिजे किती वर्ष तरुण म्हणायचे, की 67-68 पर्यंत तरुण म्हणायचं ?, मी अगोदरच म्हणालो होतो, मला लोकसभेत पाठवा तिथं थांबावं लागलं, राज्यसभेत थांबावं लागलं, तेव्हा म्हणाले राज्यात गरज आहे. आता म्हणतात राज्यसभेत जा.म्हणजे मी विधासभेत राजीनामा द्यावा, हे कसं शक्य आहे ?, असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला. तसेच अजित पवारांकडून तुमची फसवणूक झाली का ?, या प्रश्नावर मला माहित नाही, तुम्हाला काय निष्कर्ष काय काढायचा तो काढा, असं छगन भुजबळांनी सांगितले.
शरद पवारांचं कौतुक, अजितदादांवर हल्लाबोल-
माझ्या एवढे तुम्ही पण जुने आहात ना. मंत्री म्हणून तुम्ही देखील एवढे जुने आहात. तुमचे काय वय आहे?, असा सवाल उपस्थित करत प्रश्न वयाचा नाही, मात्र ओबीसीसाठी आम्ही आवाज उचलला.जर नव्या लोकांना द्यायचे असेल तर मला उभं करायचं नव्हत, असं मत छगन भुजबळांनी व्यक्त केलं. वयाचा काय विषय घेता.आमच्यापेक्षा त्यांचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निवडून आले. परभणी आणि बीडमध्ये तुमच्या आधी तर शरद पवार तिथं पोहोचले, असं म्हणत शरद पवारांचं कौतुक केलं.