शासनाकडुन प्रतिबंधक सुगंधित तंबाखूजन्य पानमसाला बाळगणाऱ्यावर, स्थानिक गुन्हे शाखेकडून कार्यवाही

मोर्शी, अमरावती :- मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद सा. (भा.पो.से.) अमरावती ग्रामीण यांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक, विक्री, साठवणूक करण्या-यावर प्रतिबंध व्हावा याकरिता मा. पोलीस अधीक्षक यांनी जास्तीत जास्त कारवाया करण्याबाबत आदेशित केले होते.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा. येथील पथक दिनांक २२/१२/२०२४ रोजी मोर्शी उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली की, शम्स कॉलनी मोर्शी येथील राहणारा अब्दुल राजीक मोहम्मद आरीफ, वय २६, रा. शम्स कॉलनी मोर्शी याने त्याचे राहत्या घरी राज्य शासनाकडून प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखूजन्य पानमसाला बाळगून ठेवला आहे. अशा माहितीवरुन आरोपीच्या घरातील हॉलची झडती घेतली असता आरोपीचे ताब्यातुन अवैधरित्या गुटखा कि. १,५५,७००/ रू चा माल मिळून आला. तसेच नमूद हॉलमध्ये आरोपीचा मित्र तौसीफ खान कलीम खान वय ३२ वर्षे, रा. खोलवटपुरा मोशी याचे ताब्यातून एकूण ३५,०२५/- रू चा माल मिळून आला. अशा प्रकारे आरोपीचे नाव:-
१) अब्दुल राजीक मोहम्मद आरीफ, वय २६, रा. शम्स कॉलनी मोर्शी व
२) तौसीफ खान कलीम खान वय ३२ वर्षे, रा. खोलवटपुरा मोर्शी यांचे ताब्यातून राज्य शासनाकडून प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखूजन्य पानमसाला एकूण किं १,९०,७२५ रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला. सदर मुददेमाल व आरोपी पुढील कारवाई करीता पो.स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही मा.श्री. विशाल आनंद (भा.पो.से), पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा, मा.श्री. पंकज कुमावत, (भा.पो.से), अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा., पो.नि श्री. किरण वानखडे स्थागुशा अमरावती ग्रामीण यांचे मार्गदर्शनात पोउपनि सागर हटवार, पोलीस अंमलदार बळवंत दाभणे, रवि बावणे, पंकज फाटे, विलास रावते यांनी केली आहे.