अमरावती विद्यापीठ परिसरात बिबट्याचे पिल्लू

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली. विद्यापीठाच्या डॅम मार्गावरील यूजीसी गेस्ट हाऊस जवळ एका कामगारावर बिबट्याच्या पिल्ल्याने हल्ला केला. हल्ल्यात कामगार किरकोळ जखमी झाला, पण सुदैवाने त्याला थोडक्यात बचाव करण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच, विद्यापीठ सुरक्षा रक्षकांनी तात्काळ धाव घेतली आणि कामगाराला सुरक्षित ठिकाणी नेले. वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी पोहोचून पिल्ल्याला जेरबंद केले. पिल्ला गोंधळलेला आणि घाबरलेला असल्याने हल्ला केला असावा, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. जाणून घेऊया घटनेची माहिती आमचे प्रतिनिधि अजय शृंगारे यांच्या कडून.
यापूर्वी देखील अशा प्रकारे दोन्ही बिबट पिल्ले आणि मादी बिबट परिसरात वावरताना काही लोकांनी आधीच पाहिले होते. वनविभागाने जखमी कामगाराला उपचार तर दिला तसेच, परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, यापूर्वीही अशा घटनांचा सामना विद्यापीठ परिसरात करण्यात आलेला आहे. त्यामुळे मॉर्निंग वाक ल जाण्याऱ्यानी सावधगिरीने प परिसरात भ्रमण करावे, जेणे करून कुठल्याही आपघाताला आपल्याला सामोरे जावे लागणार नाही.