अमित शहांविरोधात अमरावतीत बसपा आक्रमक

अमरावती :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने अमरावतीत आता बसपा देखील आक्रमक झाली आहे, अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी बसपा शिष्टमंडळाने केली असून अमित शहा यांच्या विरोधात एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.. अनेक मागण्यांचे फलक हाती घेऊन बसपाने धरणे आंदोलन केलं जिल्हाधिकारी कार्यालय जवळझालेल्या आंदोलनात शेकडो बसपा पदाधिकारी उपस्थित होते .
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी बसपा सुप्रिमो उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केली होती त्यांनी अमित शहा ,यांना 23डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती मात्र माफी न मागितल्याने देशभरात मंगळवारी बसपा च्या वतीने निदर्शने करण्यात आली.. मंगळवारी अमित शहा यांच्या वक्तव्याचा बसपा ने निषेध केला, तसेच परभणी येथे आंबेडकरी अनुयायांच्या आंदोलनात सहभागी असलेल्या निरअपराध लोकांवर लाठीचार्ज करण्यात आला..सोमवंशी यांचा मृत्यू झाल्याने त्या घटनेचा सुद्धा निषेध व्यक्त केला, यावेळी अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या, अमित शहा यांनी माफी मागितली नाही तर आक्रमक उग्र आंदोलन करू असा इशारा बसपा ने दिला
गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध गावागावात केला जातोय. आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. अमरावतीमध्ये बहुजन समाज पार्टीने जिल्हाकचेरीवर आंदोलन केलं. अमित शहांनी माफी मागितली नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा बसपाने दिलाय. ताज्या बातम्यांसाठी पहात रहा सिटी न्यूज.