LIVE STREAM

AmravatiLatest NewsMaharashtra Politics

आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या सूचनेवरून भुयारी गटार योजनेसाठी १,७१८ कोटींची योजना प्रस्तावित

अमरावती २४ डिसेंबर :- अमरावती शहराला आगामी ५० वर्षापर्यंत मुबलक पाणी पुरवठा करणारी अमृत -२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजना ८६५.२६ कोटींची योजना मंजूर करून आणणाऱ्या विकासाच्या भगीरथ अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी आता शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामांना गती देण्याचे नियोजन केले आहे. मागील अमृत टप्पा-१ अंतर्गत रखडलेल्या अमरावती शहर भुयारी गटार योजनेची कामे आता केंद्र पुरस्कृत अमृत टप्पा-२ च्या १,७१८ कोटींच्या सुधारित कृती आराखडा मध्ये समाविष्ठ करून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. नजीकच्या काळात प्रस्ताव मंजूर करून आणून अमरावती शहरात भुयारी गटार योजनेच्या कामांना गती देणार असल्याचा मनोदय नवनिर्वाचित आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला आहे.

अमरावती शहरात रखडलेल्या भुयारी गटार योजनेकरिता माननीय उच्च न्यायालयात रिपीटिशनल याचिका स्वीकृत झाली असल्याच्या बातम्या शहरातील विविध वृत्तपत्रांमधून प्रकाशित झाल्या नंतर आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून शहरातील भुयारी गटार योजनेसंदर्भातील सध्याची वस्तूस्थिती बाबत अवगत केले आहे.

केंद्र पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत टप्पा -१ योजना सन २०१८ मध्ये मंजूर झाली असून निधी अभावी ही थंडबस्त्यातच होती. दरम्यान वर्ष २०१९ मध्ये अमरावती विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या नंतर आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी गेल्या ०६-१२-२०१९ रोजी अमृत-१ अंतर्गत पाणी पुरवठा व भुयारी गटार योजने संदर्भात मजीप्रा कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. यामध्ये केंद्र पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत टप्पा -१ योजना संदर्भात माहिती विचारण्यात आली असता तत्कालीन उपविभागीय अभियंता यांनी अमृत टप्पा १ अंतर्गत शहर भुयारी गटार योजनेचे २८ टक्के काम पूर्ण झाले व २०.३१ कोटी इतका निधी खर्च झाला असल्याची माहिती माहिती दिली. योजनेच्या वित्तीय आकृतीबंधानुसार अमरावती महानगर पालिकेचा स्वहिस्सा निधी अभावी योजनेचे उर्वरित कामे हाती घेणे शक्य नसल्याचे सुद्धा मजीप्रा अभियंत्यांनी सांगितले होते. तसेच योजनेत काही तांत्रिक बदल झाल्याने कामे प्रलंबित असल्याची माहिती सुद्धा मजीप्रा अभियंत्यांकडून देण्यात आली.

तदनंतर आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी मागील २५-०४-२०२२ रोजी मजीप्रा कार्यालयात बैठक घेतली असता भुयारी गटार योजनेवर मंथन करण्यात आले. यावेळी अमृत -१ भुयारी गटार योजनेत शहराची वाढती लोकसंख्येचे अनुमान लक्षात घेता तसेच योजनेचे आयुर्मान (कालावधी )संदर्भात सुद्धा नियोजन नसल्याने ही योजना आगामी दृष्टीने परिपूर्ण नसल्याचे सुद्धा बैठकीतुन समोर आले होते. या योजनेसाठी अमरावती महानगर पालिका आपला स्वहिस्सा देऊच शकत नसल्याने योजना पूर्ण होणार नसल्याचा सुद्धा बैठकीत खल देण्यात आला.

त्यामुळे केंद्र पुरस्कृत अमृत -२ चा पथदर्शी प्रकल्प हाती घेऊन अमृत टप्पा-१ अमरावती भुयारी गटार योजनेमधील उर्वरित कामांना अमृत टप्पा-२ मध्ये समाविष्ट करण्यात यावे, तसेच वर्ष २०५४ पर्यंतची शहराची लोकसंख्या गृहीत धरून तसा परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आमदार महोदयांच्या वतीने बैठकीतून करण्यात आल्यात. त्यांनतर मजीप्रा प्रशासनाच्या वतीने आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या मागील दोन बैठकांमध्ये दिलेल्या सूचनांच्या संदर्भान्वये परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला.

अशातच दरम्यानच्या काळात आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी अमरावती शहराला आगामी ५० वर्षा पर्यंत मुबलक पाणी पुरवठाची सोय व्हावी म्ह्णून अमृत-२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजना ८६५.२६ कोटीची योजना शासनाकडून मंजूर करून आणली आहे. अमरावतीसाठी एकाच वेळी दोन योजना प्रस्तावित करण्यात आल्या. मात्र राज्य शासनाकडून एका वेळी एका मतदार संघासाठी केवळ एकच योजना कार्यान्वित करता येऊ शकते,असा नियम आहे. म्ह्णूनच केंद्र पुरस्कृत अमृत-२ अभियान अंतर्गत गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समिती ( एसएलटीसी ) च्या बैठकीत एकच योजना म्हणजे अमृत-२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा ८६५.२६ कोटींची योजना मान्य करण्यात आली व केंद्र सरकारकडे शिफारस करून योजनेला मंजुरी देखील मिळाली होती. त्यामुळे केंद्र पुरस्कृत अमृत -२ मध्ये भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव थोडा प्रलंबित राहिला होता. पण पुढील काळात ही योजना सुद्धा कार्यान्वित करता येत असल्याने आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचा पाठपुरावा सुरूच होता.

अमृत -२ अभियान अंतर्गत भुयारी गटार योजना ही अमरावती महानगर पालिकेच्या स्वहिस्यातून कार्यन्वित करणे शक्य नाही. त्यामुळे अमृत -२ वाढीव पाणी पुरवठा योजनेप्रमाणेच केंद्र सरकार ,राज्य शासन व मजीप्रा असा योजनेचा वित्तीय आकृतीबंध करून प्रत्येकी ३३ टक्के वाट्यातून ही भुयारी गटार योजना प्रकल्प सुद्धा पूर्णत्वास आणण्याचा आ. सौ.सुलभाताई खोडके यांना मनोदय आहे.

म्ह्णूनच वर्ष २०२४ च्या अमरावती विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा निवडून येताच सर्वप्रथम अमृत -२ अमरावती भुयारी गटार योजनेला गती देण्याला घेऊन नुकतीच गेल्या १० डिसेंबर २०२४ रोजी मजीप्रात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी योजनेच्या सद्यास्थिती बाबत विचारणा केली असता मजीप्रा उपविभागीय अभियंता स्वप्नील शेंडे व शाखा अभियंता शि.वा. कुलट यांनी माहिती दिली की, अमृत टप्पा-१ योजनेच्या प्रस्तावामध्ये तांत्रिक बदल उदभवल्याने मागील दोन बैठकांमध्ये आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी दिलेल्या सूचनांच्या संदर्भानव्ये केंद्र पुरस्कृत अमृत टप्पा-२ अभियान चा सुधारित कृती आराखडा तयार करण्यात आला. प्रस्तावाची एकूण किंमत १,७१८ कोटी इतकी असून सदरचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास मंजूरीस्तव सादर करण्यात आला आहे. तसेच अमृत -१ अमरावती शहर भुयारी गटार योजनेच्या कामांचा समावेश हा अमृत टप्पा -२ च्या सुधारित कृती आराखड्यामध्ये करण्याबाबत मा.प्रधानसचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई, यांना दिनांक २२ नोव्हेंबर -२०२३ मध्ये पत्राद्वारे विनंती करण्यात आली असल्याचे सुद्धा बैठकीतून सांगण्यात आले. तसेच सदर अमृत -२ योजना अमरावती शहराची संभाव्य पुढील ३० वर्षाची वाढ गृहीत धरून सन २०५४ पर्यंत या वर्षाकरिता संकल्पित करण्यात आली आहे.

यावर अमृत टप्पा -२ चा सुधारित कृती आराखडा मंजूर झाल्यानंतर योजनेची उर्वरित कामे करणे शक्य होणार असल्याने आमदार महोदयांनी अमृत टप्पा -२ च्या १,७१८ कोटींचा सुधारित कृती आराखडा मध्ये अमरावती शहर भुयारी गटार योजनेचा समावेश करण्यासाठी शासनाकडे आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासित केले. तसेच ज्याप्रमाणे अमृत-२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा मंजूर करून आणली. आगामी काळात अमृत टप्पा -२ अमरावती भुयारी गटार योजनेच्या १,७१८ कोटींच्या प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून आणण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे आमदार महोदयांनी सांगितले. तसेच सदर योजनेवर अमरावती महापालिकेला कुठलाही हिस्सा भरावा लागणार नाही, कुठलाही भार पडणार असून केंद्र सरकार , राज्य शासन व मजीप्रा प्रशासनाकडून प्रत्येकी ३३ टक्के हिस्सा ठरवून व मजीप्राला सुद्धा शासनाकडूनच निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून अमृत-२ अमरावती भुयारी गटार योजना नजीकच्या काळात पुरेपुरपणे अंमलात आणण्यात येईल. असे आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी स्पष्ट केले आहे.

मा.उच्च न्यायालयात रिपीटिशनल दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांना आ.सौ. सुलभाताई खोडके यांचे सडेतोड प्रत्योत्तर

अमरावती शहर भुयारी गटार योजनेसंदर्भात मा.उच्च न्यायालयात रिपीटिशनल दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांना आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी सडेतोड प्रत्योत्तर दिले आहे. याचिका कर्ते हे वर्ष १९९९ते २००४ पर्यंत ते आमदार व राज्यमंत्री दर्जा असतांना त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री होते, वर्ष २००४ ते २००९ पर्यंत पालकमंत्री व राज्यमंत्री असतांना सुद्धा त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री सुद्धा होते. तदनंतर वर्ष २०१४ मध्ये ते पुन्हा आमदार झाले व कॅबिनेट दर्जाही मिळाला होता , तेव्हाही त्यांच्याच पक्षाचेच मुख्यमंत्री होते. असे असतांना याचिकाकर्त्यांनी काहीच पाठपुरावा का केले नाही ? यावरून शहरातील स्वच्छता व जनतेच्या आरोग्याप्रती त्यांची अनास्था व्यक्त होत नाही का ? वर्ष २०१८ मध्ये केंद्र पुरस्कृत अमृत अभियान टप्पा-१ मंजूर करण्यात आली. यामध्ये अमरावती महानगर पालिकेला वर्ष २०१९ पूर्वी आपला स्वहिस्सा देणे गरजेचे होते. परंतु अमरावती महानगर पालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता महापालिकेचा स्वनिधी प्राप्त न झाल्याने ही योजना बारगळली होती. तेव्हा अमरावती महापालिकेवर योनजेंचा भार न पडता शासनाकडून निधी मिळविण्यासाठी याचिकाकर्त्यांनी प्रयत्न करायला हवा होता. असा सवाल आ.सौ. सुलभाताई खोडके आमदार महोदयांनी उपस्थित केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!