गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा नांदेडमध्ये निषेध

नांदेड :- लोकसभेच्या अधिवेशनामध्ये संविधानावर चर्चा चालू असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत वादग्रस्त वक्तव्य वक्तव्य केलं. त्या वक्तव्या नंतर शहा यांच्या विरोधात देशभरात विरोधक आंदोलन करत आहेत. नांदेडमध्ये काँग्रेसचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकार्यालया पर्यंत अमित शहांच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलाय .या मोर्चात काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.गृहमंत्र्यांनी देशाची माफी मागावी, राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे खासदार प्रा.रवींद्र चव्हाण यांनी केलीय.
गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ आंबेडकरांबद्दल लोकसभेत वक्तव्य केलं याबद्दल या वक्त्यव्याचा निषेध देशभरात होतो आहे .सगळीकडे पडसाद उमटत आहेत ठिकठिकाणी मोर्चे काढले जाताहेत ताज्या बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज