LIVE STREAM

Crime NewsLatest NewsNagpur

चोरट्यांनी जाळल्याचा रचला बनाव, पोलिसांना CCTV मधून समजलं ; काय घडलं ?

नागपूर :- नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून जाळून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं उघड झालं आहे. मोटारसायकलवर आलेल्या चार युवकांनी त्या तरुणाचं अपरहण केलं. त्यानंतर त्याजवळील ६० हजार रुपये हिसकावून घेतल्याचं त्याने सांगितलं. चौकशीदरम्यान त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं उघडकीस आलं आहे. ही घटना कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी युवकाविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. चैतन्य केशव उके वय २० रा. शिवनगर, कांद्री, असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे.

२० वर्षीय तरुणाने रचला लुटपाट करुन जाळल्याचा बनाव

२० डिसेंबर रोजी चैतन्य हा आंबेडकर चौकात उभा होता. यावेळी दोन मोटारसायकलवर चार जण आले. त्यांनी बळजबरीने मोटारसायकलवर बसवून त्या तरुणाला गाडेघाट नाल्याजवळील पुलाजवळ नेले. तेथे मारहाण करून त्याच्या जवळील ६० हजार रुपये हिसकावले. त्यानंतर अंगावर पेट्रोल टाकून जाळले आणि पसार झाले.

नेमकं काय घडलं ?

याप्रकरणी कन्हान पोलिसांनी लुटपाटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र चौकशीदरम्यान पोलिसांना अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केली असता, कन्हानमधील एका पेट्रोल पंपावरून तरुणाने पेट्रोल घेतलं. त्यानंतर त्याने जाळून घेतल्याचं समोर आलं. त्याने स्वत:चं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र लुटपाट करुन त्याला चार युवकांकडून जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा बनाव त्याने केला होता. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही पाहिल्यानंतर त्याची चौकशी केली. त्यात त्याने स्वत: पेट्रोल अंगावर ओतल्याचं दिसलं.

सीसीटीव्हीद्वारे पोलिसांच्या नेमकी बाब लक्षात आली

सीसीटीव्हीद्वारे प्रकरण लक्षात आल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत त्याने माहिती दिली, की अज्ञात मोबाईलधारक सतत माझ्या मोबाईलवर संपर्क साधून पैशांची मागणी करत आहेत. ठार मारण्याची धमकी देत आहे. त्यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं चैतन्यने पोलिसांना सांगितलं.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!