धारणी त अमृत आहार योजना सुरळीत शुरु
धारणी :- धारणी तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या वतीने योजना राबवल्या जातात गर्भवती महिलांना तसेच स्तनदा,व चिमुकल्या मुलांसाठी अमृत आहार योजना तसेच सकस आहार योजना महाराष्ट्र शासना च्या वतीने चालवीली जात आहे मात्र काही कारणास्तव धारणी तालुक्यातील ऐक ते दोन दीवस काही गावातील अंगणवाडी ऐथील अमृत आहार बंद होता मात्र धारणी तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल अंबुलकर यांच्या प्रयत्नाने त्या योजना सुरु झाल्याहेत .
धारणी मेळघाटमध्ये येथे होणाऱ्या मातामृत्यूं व बालमृत्यू ला पायबंद घालण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे गर्भवती,स्तनदा माता व बालकांसाठी अमृत आहार योजना व सकस आहार योजना राबवली जाते धारणी तालुक्यातील ऐक दोन गावातील आम्रुत आहार बंद होता तेथील समस्या बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल अंबुलकर यांनी जाणून घेतल्या व पुन्हा आम्रुत आहार सुरळीत शुरू केला आहे तसेच प्रत्येक अंगणवाडी बिट पर्वेक्षीका राधिका जामले, साधना धोटे,गंगा अखंडे, निकीता पटेल, शकुंतला राठोड, बेठेकर, शकुंतला बेठेकर, अनीता उईके यांच्या सह संपूर्ण बिट च्या अंगणवाडी केंद्राची पाहणी केली अडचणी सोडविण्यासाठी अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून आम्रुत आहार व्यवस्थित शुरु केला आहे आणि सर्व गर्भवती व स्तनधा मातांना व मुलांना आहार मिळत आहे.
मेळघाट धारणीसाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबवल्या जातात त्यासाठी भरपूर निधींचंही प्रावधान केलं जातं परंतु बऱ्याचदा योजना राबकणाऱ्यांच्या उदासीनतेमुळे लाभार्थ्यांपर्यंत योजना पोचत नाहीत दक्ष अधिकारी मात्र त्यातील अडचणी दूर करून लाभार्थ्यांपर्यंत योजना पोचवतात . त्याचं हे उदाहरण आहे. ताज्या बातम्यांसाठी पहात रहा सिटी न्यूज.