Latest NewsNagpur
बुटीबोरीच्या उड्डाण पुलाचा काही भाग कोसळला

नागपूर :- नागपूरच्या बुटीबोरी येथील उडाणपुलाचा काही भाग कोसलाय सुदैवाने जीवित हानी झाली नाही अत्यन्त वर्दळीचा असा हा रस्ता आहे उडान पुलाच्या खालच्या बाजूचा काही भाग कोसळल्यामुळे वाहतुकीसाठी उडान पूल बंद.. ठेवण्यात आलाय उडाणपुलाच्या मधल्या आधारानंतर साईडने लोखण्डी गोल पाइपचा आधार दिलाय या पाईपचे सिमेंट काँक्रीट उखडून खाली पडलं खालचा आधार सरकल्याने उडाणपुलाच्या वरील संरक्षण भिंतीला तडा गेलाय. पुलावर भेग पडलीय सम्भाव्य धोका ताडून उडाणपुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय.
पूल असो किंवा उडाणपूल त्याचे ऑडिट होणं गरजेचं आहे उड्डाणपूल किती साली बनला, त्याचं आयुष्य त्याची डागडुजी या सगळ्या गोष्टी महत्वपूर्ण ठरतात पुलाच्या खालून आणि वरून सतत वाहतूक सुरु असते अशावेळी वाहतूक करणाऱ्यांच्या जीविताचे रक्षण महत्वपूर्ण ठरतं.