शहरात येण्यापूर्वीच गांजावर गुन्हे शाखेची झडप

अमरावती :- अमरावती शहरात गांजा ची खेप येताच शहर गुन्हे शाखेने त्यावर छापा टाकला , 17 किलोचा गांजा बडनेरातून अमरावती शहरात आणला जात होता गुप्त माहितीच्या आधारे शहर गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात पथकाने कारवाई केली . बडनेरा येथून ऑटो ने अमरावती शहरात येणारा १७ किलो गांजा शहर गुन्हे शाखेने जप्त करून तिघांना ताब्यात घेतलय .
त्यान्च्याकडून ऑटोसह गांजा असा 3 लाख 66 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय मंगळवारी सायंकाळी शहर गुन्हे शाखा पथक 1 ने सापळा रचून छापा टाकला गोविंद महाराज आश्र मा जवळ ऑटो अडवून तिघाना ताब्यात घेतले आरोपी सयद मेहबूब सयद्द रहेमान वय 62 राहणार सुफियान नगर अमरावती दुसरा आरोपी अब्दुल नाजीम अब्दुल कयूम वय 47 वर्ष राहणार हजरा नगर अमरावती तिसरा आरोपी राजुनाम आप्पा मुंजाळे राहणार राजुरा अशा तीघाना ताब्यात घेऊन कारवाई केली. शहर गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात पथकाने कारवाई केली.
अमरावती शहरामध्ये अमली पदार्थांची विक्री वाढवण्यासाठी चोरी छुपे गांजा व तत्सम पदार्थ आणले जातात परंतु पोलीस सतर्कतेने या चोरट्या व्यापारावर आपली करडी नजर रोखून आहेत ताज्या बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज.