सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांनी खरंच मदत केली का, विनोद कांबळीने एका वाक्यात विषय संपवला

ठाणे :- विनोद कांबळीला मदत करण्यासाठी बऱ्याच व्यक्ती पुढे आल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने विनोदचा लहापणीचा मित्र सचिन तेंडुलकर आणि भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा नावाचा समावेश होता. पण सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांनी खरंच मदत केली का, असा प्रश्न विनोद कांबळीला विचारण्यात आला होता. विनोद कांबळीने यावेळी एका वाक्यातच संपूर्ण विषय संपवल्याचे पाहायला मिळाले.
विनोद कांबळी सर्वांसमोर आला होता तो रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मारक अनावरणाच्या कार्यक्रमात. त्यावेळी सचिन तेंडुलकर त्याला भेटायला आला होता आणि त्यानंतर या दोघांचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर विनोदच्या या अवस्थेमध्ये सचिन त्याला मदत का करत नाही, असा प्रश्न चाहत्यांमध्ये उठायला सुरुवात झाली होती. त्यानंतर काही दिवसांतच सुनील गावस्कर यांनीही आपण विनोदला मदत करणार असल्याचे सांगितले होते. पण हे दोघे खरंच विनोद कांबळीला मदत करत आहेत की नाही, हे आता समोर आले आहे. कारण विनोद कांबळीनेच याबाबतचे उत्तर दिले आहे.
सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांनी तुम्हाला मदत केली का, असा प्रश्न विनोद कांबळीला विचारण्यात आला होता. या प्रश्नावर विनोद कांबळीने सांगितले की, ” हो, या दोघांनीही मला मदत केली आहे. ” त्यानंतर विनोद कांबळीला प्रश्न विचारण्यात आला की, या दोघांनी तुम्हाला नेमकी कोणती मदत केली आहे. त्यावर विनोद कांबळीने सांगितले की, ” मी आता हॉस्पिटलमध्ये आहे, त्यामुळे ते मला कसं माहिती असणार. पण माझी पत्नी अँड्रीयाला मात्र याबाबत सर्व माहिती आहे. तुम्ही तिला याबाबत विचारणा करू शकता. ” विनोद कांबळीला जेव्हा हार्ट अटॅक आला होता. तेव्हा त्याला लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याचा सर्व खर्च सचिन तेंडुलकरने केला होता, त्यानंतरही सचिन विनोदला मदत करत असल्याचे समोर आले आहे.
विनोदला सचिन आणि सुनील गावस्कर यांनी मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. पण या दोघांनी नेमकी कोणती मदत केली, हे विनोदची पत्नीच स्पष्ट करू शकते. त्यामुळे या प्रश्नावर विनोदची पत्नी अँड्रीया याबाबत काय माहिती देते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे. पण विनोदला मदत करण्यासाठी त्याचे मित्र आणि चाहते नेहमीच तत्पर असल्याचे समोर आले आहे.