हैदरपूरा आणि रहमत नगरवासीयांची पीआर कार्डची मागणी
नागपूर :- नागपूरच्या पश्चिम भागातील हैदरपूरा, रहमत नगर, रोशन नगर, गुलशन नगर, बाबा चौक, अन्सार नगर, पठाणपुरा, पाटीपुरा आणि कमेला ग्राउंड या भागांमध्ये नागरिक गेली 70 वर्षांपासून राहत आहेत. मात्र, अद्यापही त्यांना त्यांच्या जमिनीवर मालकी हक्क मिळालेला नाही.
2019 साली प्रशासनाने या भागातील नागरिकांना पीआर कार्ड देण्यासाठी सर्वेक्षण केले होते, परंतु आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे नागरिकांना सरकारी योजना, विशेषतः प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभ घेण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
निवेदन सादर करताना नागरिकांची उपस्थिती :-
या निवेदनासोबत अॅड. शाहरूख शाह, शरीफ खान, रहीम राही, हाफीज अहेफाज, असलम रहबर, शेख शकील, शहेबाज खान, मोहम्मद फरीद, मुहीब अली, मुजाहीद खान, असरार कुरेशी, नईम रहबर, अ. सगीर, सुमेर खान आणि अनेक नागरिक उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते रहीम राही यांची प्रतिक्रिया :-
“पीआर कार्ड मिळणे हा आमचा हक्क आहे. पीआर कार्ड नसल्यामुळे गरीब जनता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरांच्या लाभापासून वंचित आहे. जर एका महिन्याच्या आत आमच्या मागण्यांवर कारवाई झाली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, आणि न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरू राहील,” असे सामाजिक कार्यकर्ते रहीम राही म्हणाले.
“हैदरपूरा आणि रहमत नगरसारख्या भागातील नागरिकांच्या पीआर कार्डच्या मागणीमुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता प्रशासन या समस्येवर काय उपाययोजना करेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सिटी न्यूजवर आम्ही या प्रकरणाचे पुढील अपडेट्स देत राहू. पाहत राहा, सिटी न्यूज.