३०७ च्या तीन आरोपीना २ तासातच अटक

नागपूर :- नागपूरच्या नंदनवन पोलिसांनी चाकूहल्ला करणाऱ्या तिघांना अटक केलीय . फिर्यादीवर चाकू हल्ला केल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली होती त्यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी दोन तासातच तीन मुलांना ताब्यात घेतलंय. अगदी क्षुल्लक कारणावरून आरोपींची फिर्यादीला चाकू मारून जखमी केलं.
अल्पवयीन असल्यापासून गुन्ह्यांमध्ये लिप्त असलेल्या तीन आरोपीना नागपूर येथील नंदनवन पोलीसांनी ताब्यात घेतलंय. सद्दाम हुसेन खान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करून दोन तासातच आरोपीना अटक केली. आरोपी मजुरांशी भांडत असताना सद्दाम हुसेन यांनी मध्यस्थी केली त्याचा बदला म्हणून आरोपींनी त्यांना चाकू हल्ला जखमी केलं रक्तबंबाळ अवस्थेत त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक जयवन्त पाटील यांनी माहिती दिली.
लहान वयामध्ये मुलं गुन्हेगारी वृत्तीकडे वळत असल्याचे अनेक उदाहरणं समोर येत आहेत बदलाच्या भावनेतून खुनशीपणाने कृत्य करून मुलं आपलं आयुष्य बरबाद करतात त्याना मार्ग दाखवणार कोण असा प्रश्न आहे. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज.