LIVE STREAM

Accident NewsLatest NewsState

40 हजार किलोच्या कंटेनरखाली कारचा चेंदामेंदा! सांगलीतील CEO सहीत कुटुंबातील 6 जण जागीच ठार

बेंगळुरू :- एका विचित्र रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि निर्देशकाबरोबरच त्याच्या कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 48 वर्षीय सीईओबरोबरच या अपघातामध्ये त्याची पत्नी आणि तीन लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे. कोट्यवधी रुपयांच्या कारमधून प्रवास करत असताना त्यांच्या कारवर सिमेंटचे पिलर्स घेऊन जाणारा कंटेनर पडला. 40 हजार किलो वजनाच्या या कंटेनर खाली या सीईओचं संपूर्ण कुटुंब चिरडलं गेलं. बंगळुरु-तुमाकुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर तालेकारे येथे निलामंगला पोलीस स्थानकाच्या हद्दीत शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

नक्की घडलं काय ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाग्रस्त कंटेनर हा बंगळुरुच्या दिशेने जात होता. त्यावेळी चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. अचानक या कंटेनरसमोर आलेल्या कारला धडक देऊ नये या हेतूने चालकाने कचकचून ब्रेक दाबला आणि उजवीकडे स्टेअरिंग वळवलं असता तो एका लॉरीला धडकला. कंटेनर चालक हरीफ अन्सारी हा मूळचा झारखंडचा असून एका कारला धडक न देण्याच्या प्रयत्नात त्याच्या कंटेनरने डिव्हायडर तोडून समोरच्या लेनमध्ये प्रवेश केला. मागे 40 हजार किलोचं वजन असल्याने कंटेनर कलंडला आणि बाजूच्या लेनमधून जाणाऱ्या या सीईओच्या आलीशान कारवर पडला. या अपघातात कारमधील सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला.

मृतदेह बाहेर काढतानाही कसरत

मरण पावलेल्यांची ओळख पटली आहे. कारचे चालक चंद्रयागोपाल गौल (46) हे आयएएसटी सॉफ्टवेअर कंपनीचे कार्यकारी निर्देशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांच्याबरोबरच त्यांची पत्नी गौरबाई (40), चंद्रयागोपाल यांची बहीण विजयालक्ष्मी (35) या तिघांबरोबरच तीन लहान मुलांचाही मृत्यू झाला. मृत मुलांमध्ये चंद्रयागोपाल यांचा 16 वर्षांचा मुलगा जान, 10 वर्षीय मुलगी दिक्षा आणि 6 वर्षीय भाची आर्याचाही समावेश आहे. हे सर्वजण विजयपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. अपघात एवढा भीषण होता की कंटेनरखाली दाबल्या गेलेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढतानाही पोलिसांबरोबर प्रशासनाला फार कसरत करावी लागली. कंटेनरचालकालही गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

एक कोटींहून अधिक किंमतीची कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये चंद्रयागोपाल यांचा काहीच दोष नव्हता. चंद्रयागोपाल यांचं कुटुंब नव्याकोऱ्या व्होलव्हो एसयुव्हीमधून प्रवास करत होते. ही सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक आहे. ही कार एक कोटींहून अधिक किंमतीची आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!