गाडगे महाराज यांच्या प्रेरणेने ग्रामवासीयांनी दिला स्वच्छतेचा संदेश

अमरावती :- भातकुली तालुक्यातील देवरी गावात गाडगे महाराज यांच्या मूर्तीची स्थापना केली गेली. या सोहळ्यात शेतकरी, कष्टकरी आणि शेतमजूर असलेल्या गावातील सर्वधर्मसमभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला गेला.
गावातील सर्व नागरिकांनी दिनांक 23 डिसेंबरला गाव स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला. यानंतर स्वच्छतेच्या महत्त्वावर जोर देणारी मिरवणूक काढण्यात आली, ज्यात गावातील लोक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. 24 डिसेंबरला गाडगे महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि गावातील लोकांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली. या मिरवणुकीत तालुक्यातील इतर गावांमधूनही लोक सामील झाले होते. 25 डिसेंबरला महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सोपान महाराज यांच्या हस्ते काल्याचे कीर्तन झाले. यावेळी गावातील प्रमुख व्यक्तींनी आपले विचार मांडले. यामध्ये मानव दादा मोझरी यांचे मार्गदर्शन तसेच गावाचे सरपंच सचिन हाडे, ग्रामपंचायत सचिव युवराज जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष जानरावजी गावंडे आणि समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.
भातकुलीचे आमचे प्रतिनिधि गजानन खोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार या आयोजनात गावातील सर्वांनी आपल्या पद्धतीने सहकार्य केले, ज्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. स्वच्छतेचा संदेश आणि गाडगे महाराज यांच्या शिकवणीने गावात एक नवा उत्साह आणि सुसंस्कृतता निर्माण झाली आहे. अशाच सर्व अपडेटस् साठी बघत रहा सिटी न्यूज.