जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्नांत सातत्य ठेवाडॉ. मृणालिनी फडणवीस यांचे संशोधक विद्याथ्र्यांना आवाहनविद्यापीठात आविष्कार-2024 स्पर्धेचा समारोप
अमरावती : – आज जी माणसं मोठी झाली आहेत असे आपण मानतो, ते नक्कीच इतरांपेक्षा वेगळे होते आणि जीवनात असेच मोठे आणि यशस्वी व्हायचे असेल, तर प्रयत्नांमध्ये सदैव सातत्य ठेवा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी विद्याथ्र्यांना केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात दोन दिवसीय आविष्कार -2024 स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, अविष्कार सेलच्या समन्वयक डॉ. वैशाली धनविजय, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य संचालक डॉ. अजय लाड, आयोजन सचिव डॉ. गजानन मुळे उपस्थित होते.
डॉ. फडणवीस म्हणाल्या, संशोधनाची सुरू केलेली प्रक्रिया आव्हान म्हणून स्वीकार करा. प्रथमत: आपण सुरू केलेलं कोणतंही कार्य फार लहान आहे, असेही समजू नका. कारण अशा लहानशा कृतीतूनच अनेक माणसं मोठी झाली आहेत, असे सांगून त्यांनी अनेक उदाहरणे देखील दिलीत. आपल्यातील क्षमता ओळखा. शासनाच्या अनेक योजनाही आहेत, त्याचाही लाभ घ्या. कोणत्याही संस्थेत क्षमतेपेक्षा अधिक जागा भरल्या जावू शकत नाही. देशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी आपलाही पुढाकार तितकाच आवश्यक आहे, असे सांगून पुढील जग हे डिजिटल असणार आहे व या जगात आपल्याला टिकून रहावयाचे असेल, तर तेवढीच क्षमता आपल्यातही निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी सातत्य ठेवा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी विद्याथ्र्यांना केले.
कुलसचिव डॉ. अविनाश असनारे म्हणाले, विद्याथ्र्यांनी समाजपयोगी संशोधन आणि संकल्पना राबवाव्यात. विद्यापीठाला कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या रुपाने उत्तम नेतृत्व लाभले आहे. आव्हान स्पर्धेत विद्याथ्र्यांना जे जे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घ्यावे लागले, ते कुलगुरूंनीही विद्याथ्र्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी स्वत: करुन दाखविले. त्यामुळे विद्याथ्र्यांनी यातून प्रेरणा घेवून आपले भविष्य घडवावे. इन्क्युबेशन सेंटरला संशोधनासाठी जी काही मदत लागेल, ती प्रशासनाकडून केली जाईल, असे आ·ाासनही याप्रसंगी कुलसचिव डॉ. असनारे यांनी दिले.
संशोधनाकरीता विद्यापीठात उपक्रम सुरू करणार – कुलगुरू
विद्याथ्र्यांना संशोधन करता यावे, याकरीता विद्यापीठात आणखी उपक्रम सुरू केले जातील. त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक ती आर्थिक मदतही करण्यात येईल. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये सुध्दा संशोधनासाठी विशेष सेल सुरू करण्यात येईल. विद्याथ्र्यांनी संशोधनाच्या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि पुढे होणा-या राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेत जास्तीत जास्त पुरस्कार मिळवून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा नावलौकीक वाढवावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्याथ्र्यांना केले.
संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक व अहवाल वाचन डॉ. वैशाली धनविजय यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. हर्षा देशमुख व डॉ. अभिजित इंगळे यांनी, तर आभार भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. गजानन मुळे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी, संशोधक विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ संख्येने उपस्थित होते.