LIVE STREAM

AmravatiLatest NewsSports

भारतरत्न अटलबिहारींच्या जन्मशताब्दी निमित्य हाफ मॅरेथॉन स्पर्धा

अमरावती :- भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्म शताब्दीच्या निमित्ताने गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था व अमरावती जिल्हा अथलेटिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अटल दौड राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली . विविध वयोगटात हि स्पर्धा घेण्यात आली. दसरा मैदानातून स्पर्धेला सुरवात झाली. स्पर्धेदरम्यान आवश्यक पोलिस बंदोबस्त, वाहतूक पोलिस तसेच मोठ्या प्रमाणात शिक्षक आणि ५०० हून अधिक स्वयंसेवक या स्पर्धेसाठी तैनात होते. या स्पर्धेत महाराष्ट्रभरातील 3457 स्पर्धक धावले.

गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था व अमरावती जिल्हा ॲथलेटिक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्य आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३४५७ पेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता. अतिशय उत्कंठापूर्वक वातावरणात २१ कि.मी. अंतराची हाफ मॅरेथॉन सकाळी वेळेवर ५.३० वाजता सुरू झाली.

यावेळी मुख्य आयोजक तुषार भारतीय , गेल इंडिया कंपनीचे प्रा रवी कोल्हे , माजी महापौर चेतन गावंडे , प्रशांत शेंगोकर , प्रा अतुल पाटील , ऋषी खत्री , माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे, रेखा भुतडा , सुनंदा खरड , रश्मी नावंदर , लता देशमुख , प्रणित सोनी , डॉ श्याम राठी , डॉ अजय कांत , डॉ मिलिंद पाठक सोबतच अन्य मान्यवरांनी यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली .

त्यानंतर अनुक्रमे १०, ८, ५ आणि ३ किमी अंतराच्या शर्यती पार पडल्या. या शर्यतीत अमरावती शहरातील विविध घटकांनी सहभाग नोंदवला. तसेच रन फॉर अमरावतीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. २१ किमी, १० , ८ ५ , ३ किमी अंतराच्या शर्यतींना बडनेरा रोड येथील दसरा मैदानातून प्रारंभ झाला. दसरा मैदान येथून , राजापेठ , कवर नगर , फरशी स्टॉप , दस्तुर नगर , यशोधा नगर , काँग्रेस नगर , बियाणी चौक , वेल कम पॉईंट , पंचवटी चौक , राठी नगर , शेगाव नाका , विलास नगर , चौधरी चौक , जयस्तंभ चौक, जवाहर गेट, गांधी चौक, भुतेश्वर चौक , रवी नगर चौक , सातूर्णा चौक , साई नगर चौक , बेनाम चौक , नवाथे चौक ते प्रारंभस्थानी असा होता. स्पर्धेअंती सर्व गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व रोख रक्कम प्रदान करण्यात आली. १४, १६, २० ४०,व खुला गट अशी महिला व पुरुष गटात स्पर्धा घेण्यात आली.

21 किमी हाफ मॅरेथॉन स्पर्धा मध्ये पुरुष गट मधून नागपूरचे राजन यादव , 21 किमी हाफ मॅरेथॉन स्पर्धा मध्ये महिला गट मधून साताऱ्याची साक्षी जडियाल यांनी बाजी मारली 21 किमी स्पर्धेतील विजेता स्पर्धकांना दुचाकी प्रदान करण्यात आली. तसेच अन्य विजेताना रोख रक्कम प्रदान करण्यात आली. स्पर्धेच्या मार्गावर पाणी , औषधे , बिस्किटे वेदनानाशक स्प्रे इत्यादीची व्यवस्था करण्यात आली होती . त्याशिवाय स्पर्धकाला काही त्रास झालाच तर त्याला त्वरित प्रथमोपचार कसा करता येईल इत्यादी सर्व प्रकारचे प्रशिक्षण सर्व स्वयंसेवकांना देण्यात होते . एखाद्या स्पर्धकाला जास्त त्रास झाल्यास स्पर्धेच्या मार्गावर सुसज्ज रुग्णवाहिका ठेव ण्यात आली होती .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!