AmravatiCity CrimeLatest News
महानगरपालिकेची रामपुरी कॅम्प परिसरात नायलॉन मांजा जप्ती मोहीमनायलॉन मांजाची विक्री करणा-या दोन युवकांवर गुन्हा दाखल
अमरावती :- मा.आयुक्त व मा.अतिरिक्त आयुक्त यांचे आदेशान्वये व मा.वैद्यकिय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव यांच्या उपस्थितीत प्रतिबंधित नायलॉन मांजा मोहिमे अंतर्गत रामपुरी कॅम्प परीसरात नायलॉन मांजा जप्ती मोहिम राबविण्यात आली. यावेळी रामपुरी कॅम्प संतोषी माता मंदिराजवळ सापळा रचून दोन युवकांना नायलॉन मांजाची विक्री करतांना पकडण्यात आले. नियमानुसार प्रतिबंधात्मक नायलॉन मांजाचा दंड भरण्यास सांगितल्यावर दंड भरण्यास मनाई केली असता त्यांचेवर गाडगे नगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाहीमध्ये श्री विक्की जेधे पथक प्रमुख नोडल अधिकारी, श्री विजय बुरे जेष्ठ स्वास्थ निरीक्षक, श्री राजू डिक्याव जेष्ठ स्वास्थ निरीक्षक तसेच स्वास्थ्य निरीक्षक श्री इमरान खान, श्री पंकज तट्टे, श्री अनिकेत फुके उपस्थित होते.