येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा

अमरावती :- २५ डिसेम्बरला नाताळचा सण साजरा होतोय. ठिकठिकाणच्या चर्चमध्ये येशूच्या जन्मानिमित्य प्रार्थना करण्यात आली. अंबापेठ येथील अलायन्स चर्चमध्ये येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला . आबालवृद्धांनी प्रार्थना केली.
आंबापेठेतील अलायन्स चर्चमध्ये नाताळचा सण साजरा करण्यात आला. चर्चमध्ये फीज लावून सजावट करण्यात आली.. मोठ्या संख्येनं महिला पुरुष बालकांनी चर्चमध्ये प्रार्थना केली. टाळ मृदंगाच्या तालावर प्रार्थना म्हणण्यात प्रत्येकजण तल्लीन झाला . सर्वाना तारणारा दाविदाच्या गावात जन्मला अशा आशयाचं छायाचित्र चर्चमध्ये रेखाटलं आहे. अलायन्स चर्च चे फादर डी डब्ल्यू लव्हाळे. यांनी माहिती दिली.
हत्या करू नका , व्यभिचार करू नका चोरी करू नका असा संदेश येशू ख्रिस्तानी दिला आहे समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या येशू ख्रिस्तांना सिटी न्यूज परिवाराच्या वतीने प्रणाम.