शासन बंदी असलेल्या लॉटरी जुगारावर धाड

नागपूर :- युनिट 03 गुन्हेशाखेने नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली असता आरोपी इसम हा शासन बंदी लॉटरी जुगार खेळताना आढळला. गुन्हे शाखेने जप्तीची कारवाई करून 58360 रुपयांचा माल जप्त केला. आरोपीवर कलम 4,5 महाराष्ट्र .जुगार.बंदी का यद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला.
नागपूरच्या गणेशपेठेतील भोई पुरा मच्छी मार्केट, येथिल दुकानात आरोपी शासन बंदी असलेली लॉटरी खेळताना आढळले. ,युनिट 03 गुन्हेशाखेने दुकानात धाड घातली यामध्ये आरोपी. गौरव राजेश नान्हे वय 22 वर्ष रा. मत्तीपुरा, जूनी मंगलवारी दुसरा जयप्रकाश शंकर मस्के वय 42 वर्ष रा. द्वारका नगरी, साई किराना जवळ खरबी याना अटक करून कॉम्पुटर,राउटर,फर्निचर असा एकूण 58360 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त गणेशपेठ पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणातील एक आरोपी वॉन्टेड आहे. कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत हि कारवाई करण्यात आली.
गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी पोलीस लक्ष देऊन कारवाई करताहेत तरीही पोलिसांना चुकारा देऊन गुन्हेगार आपल्या कारवाया करताना दिसताहेतच.
या अशाच बातम्या साठी बघत राहा सिटी न्यूज.