AmravatiCity CrimeLatest News
गाडगे नगर पोलीस स्टेशनने चोरी गेलेली ब्रीझा गाडी केली जप्त

अमरावती :- गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत ब्रीझा गाडी चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. संबंधित तक्रारीवरून चोरी गेलेली ब्रीझा गाडी जप्त करण्यात आली. या गाडीची किंमत अंदाजे 5,00,000/- रुपये असून गाडी शोधून ताब्यात घेण्यात आली आहे. चोरी झालेली गाडी फिर्यादी सुभाष सूर्यवंशी यांची असून गाडगे नगर पोलीस स्टेशनला पुढील तपासासाठी सुपूर्त करण्यात आली आहे. ही कार्यवाही पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा ने केली आहे. पोलीस प्रशासनाने या चोरीच्या घटनेची गतीने उकल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.