गोकुळपेठमध्ये ऑनलाईन लॉटरी सट्टा बाजारावर छापामुद्देमालासग,दोघांना अटक…

नागपूर :- अंबाजरी पोलीस स्टेशन हद्दीतील गोकुळपेठ लेबर कॅम्पमध्ये ऑनलाईन लॉटरी सट्टा बाजार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी डीबी पथकासह पोलिसांनी राजश्री लॉटरी दुकानावर छापा मारला.
अंबाजरी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी केली असता, दोन आरोपी, प्रिंटर, कम्प्युटर आणि मॉनिटरसह ऑनलाईन सट्टा चालवत असल्याचे आढळले. छापामारीत 23,050/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि दोघांना अटक केली. अटक केलेल्या आरोपीं मध्ये फिरोज रहीम खान (वय 47, राहणार कोराडी) आणि अंकित रमेश गजवी (वय 25, राहणार अंबाझरी). पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील 20 ते 25 दिवसांपासून गोकुळपेठमध्ये हा सट्टा सुरू होता. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी माहिती दिली.
अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे., पोलीसांनी सट्टा आणि अशा अनधिकृत व्यवसायाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.