डॉ. चंदू सोजतीया यांच्या 64 वा वाढदिवसपत्रकारिता क्षेत्रातील वटवृक्ष

सिटी न्यूज अमरावती :- सिटी न्यूज अमरावती चॅनेलचे प्रबंध संचालक डॉ. चंदू सोजतीया यांचा आज 65 वा वाढदिवस. वयाची 64 वर्षे पूर्ण करून त्यांनी 65 व्या वर्षात पदार्पण केले आहे. पत्रकारिता क्षेत्रात एक धडाडीचे आणि प्रेरणादायक व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर चंदू सोजतीया यांची प्रवासाची सुरुवात एक आवड म्हणून झाली होती, पण ती आवड कधी त्यांच्या पॅशन मध्ये रूपांतरित झाली, हे त्यांनाही कळले नाही. डॉ. चंदू सोजतीया यांनी सुरू केलेले सिटी न्यूज चॅनेल आज फक्त अमरावतीतच नाही, तर नागपूर, यवतमाळ, नांदेड आणि पुण्यातही आपले जाळे पसरवत आहे. आपल्या चॅनेलला संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलंय आणि ते स्वप्न आज सत्यात उतरत आहे.
चंदू सोजतीया यांनी आपल्या कार्यस्थळावर अतिशय सुसज्ज आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत कार्यक्षमता वाढविणारे उपकरणे, स्मार्ट कार्यपद्धती आणि कार्यप्रवाह यांचा समावेश आहे. या कार्यालयाची रचना केल्यामुळे ना केवळ कार्याची गती वाढली आहे, तर त्याच्या माध्यमातून पत्रकारितेतील सर्व प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सुसंगत होण्यास त्यांना मदत मिळाली आहे. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे सिटी न्यूज चॅनेलला आपल्या कार्यक्षेत्रात अधिक यश आणि लोकप्रियता मिळवण्यात मदत झाली आहे. त्यांच्या स्वप्नातील कार्यालय हे आज प्रत्यक्षात उतरवले गेले असून, हे एक प्रशंसनीय कार्य आहे. या क्षेत्रात आपल बनवू पाहणारे बरेच पत्रकार आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी चंदू सोजतीया यांच्याकडे येतात. चंदू सोजतीया यांचा दृढ विश्वास त्यांच्या कर्तुत्वावर आहे. आज त्यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या क्षेत्रातील अनेक सुप्रसिद्ध पत्रकार, संपादक, प्रतिनिधी, तसेच समाजसेवक आणि प्रशासकीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे डॉ. चंदू सोजतीया यांना शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांमध्ये दीर्घायुष्य लाभो, अशी कामना सर्वांनी केली. महाकाली मंदिराचे पिठाधीश्वर शक्ती महाराज, संगम गुप्ता, शितल पांडे, जितू दुधाने, प्रवीण हरमकर, मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे, सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे सहकारी, नंदगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले, समाजसेवक अभिनंदन पेंढारी, तसेच त्यांची मित्र मंडळी, पुरुषोत्तम मुंदडा, विनोद डागा आणि इतर अनेक नामवंत व्यक्तींनी डॉ. चंदू सोजतीया यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या कार्यप्रेमी सहकाऱ्यांनी, मित्रांनी आणि चाहत्यांनी मोठ्या आदराने शुभेच्छा दिल्या.
सिटी न्यूज अमरावती चॅनेलचे प्रबंध संचालक डॉ. चंदू सोजतीया यांचा 64 वा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी आणि जिवलग मित्रांनी अत्यंत आनंद आणि उत्साहात साजरा केला. त्यांच्या कार्यालयात खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यात त्यांच्या जिवलग मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी एकत्र येऊन केक कापला आणि त्यांचा वाढदिवस साजरा केला. तसेच, त्यांच्या 64 व्या वर्षपूर्तीनिमित्त 64 दिवे लावून तसेच या खास क्षणाचे साक्षीदार होऊन उपस्थित असलेल्या सर्व लोकांनी त्यांना दीर्घायुष्य, यश आणि आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कर्तृत्वाचा आदर व्यक्त करत आणि त्यांची कार्यशक्ती सर्वांना प्रेरित करत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. चंदू सोजतीया यांची ऊर्जा, कार्यक्षमता आणि प्रेरणा आजही 20 वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी आहे. पत्रकारिता क्षेत्रात येणाऱ्या युवकांसाठी ते एक प्रेरणा आहेत. डॉ. चंदू सोजतीया अनेक युवकांचे आदर्श आहे. सिटी न्यूज परिवाराच्या वतीने आम्ही डॉ. चंदू सोजतीया यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला सलाम करतो.