दस्तूरनगर परिसरातील अतिक्रमण हटवलं
अमरावती :- अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने दस्तूर नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. हातगाड्या, पानठेले,फळ विक्रेते भाजीपाले विक्रेते यांच्या गाड्या महापालिकेनं जप्त केल्या. चार ट्र्क साहित्य जप्त केलं.
अमरावतीमधील वर्दळीच्या चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा होतो अनेकदा अपघातही घडले आहेत वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शंकर नगर रोड ते संताजी नगर तसेच गोंड बाबा मंदिर , दस्तूर नगर ते एमआयडीसी परिसर या रस्त्यावर असलेले फळ विक्रेते भाजी विक्रेते चायनीज पदार्थ विकणारे, लोखंडी हात गाड्या पानठेले, असं 4 मोठे ट्रक साहित्य जप्त केलं .
रस्त्याच्या कडेला फळ, भाजी विक्रेते आपल्या हातगाड्या उभ्या करतात तेथे खरेदीसाठी नागरिक उभे रहातात त्यांच्या गाड्या हातगाडीजवळच उभ्या केल्या जातात अशा प्रकारात अमरावतीमध्ये अपघात झाले आहेत नागरिकांचे जीव गेले आहेत अनुचित घटना टाळण्यासाठी अमरावती महानगरपालिकेची अतिक्रमणावर धडक कारवाई करतेय.