मूकबधिरांसाठी सायबर सुरक्षा कार्यशाळा

अमरावती :- द डेफ अँड डम्ब रिलीफ असोसिएशन च्या श्री बुलीदान राठी मुकबधीर विदयालय व कर्णबधीर कनिष्ठ महाविद्यालय येथे सायबर सुरक्षा कार्यशाळा घेण्यात आली. पोलीस आयुक्तालयाच्या सायबर क्राईम पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत विद्यर्थ्यांना माहिती देण्यात आली.
सायबर क्राईम विषयी मूकबधिर विद्यर्थ्यांना माहिती देण्यासाठी श्री बुलीदान राठी मूकबधिर विद्यालयात सायबर सुरक्षा कार्यशाळा घेण्यात आली.संस्थाध्यक्ष पुरुषोत्तम मुंधडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेला कार्यशाळा प्रमुख अनिकेत कासार ,प्राचार्य अरविंद राऊत,सायबर सेलचे अनिकेत वानखडे,सुनील वानखडे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत मूकबधिर विद्यर्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. इंटर पिटर संध्या तायडे यांनी साइन लँग्वेज मध्ये समजवून सांगितली.
साइन लँग्वेजमुळे मूकबधिर हि सर्वसामान्यांप्रमाणे व्यवहार करत आहेत प्रवाहात आले आहेत त्यांनाही सायबर क्राईम बद्दल माहिती असावी यासाठी बुलिदान राठी मूकबधिर विद्यालयात कार्यशाळा घेण्यात आली,. सर्वसमावेशक बातम्यांसाठी पहात रहा सिटी न्यूज.