शक्तीपीठ शक्ती महाराज, श्रीराम सेनेचे संगम गुप्ता सह अनेकांनी स्पा सेंटर वर घेतला आक्षेप

अमरावती :- शहरातील वालकट कंपाऊंड येथील जिल्हा स्त्री रुग्णालय कडे जाणाऱ्या मुख्य चौकातील एका इमारतीत स्पा सेंटर मध्ये अश्लील प्रकार चालत असल्याची माहिती मिळताच कालीमाता मंदिर पिठाधीश्वर शक्ती महाराज श्रीराम सेनेचे संगम गुप्ता आदींनी धाव घेतली .२५ डिसेम्बरच्या रात्री स्पा सेंटर च्या आत प्रवेश करून आपला संताप व्यक्त केला .घटना स्थळी एसीपी जयदत्त भवर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके आदी नी धाव घेतली . पोलिसांनी स्पा सेंटर च्या आत जाऊन पंचनामा केला, स्पा चा परवाना असल्याचे पोलिसांनी सांगितले यात पोलिसांनी अजमेर रोड जयपूर राहणारा ३२ वर्षीय स्पा मॅनेजर करून पवनकुमार शर्मा याच्या विरोधात पोलिसांनी कलम ११०,११७ अंतर्गत कारवाई करून कलम १४९ अंतगर्त नोटीस बजावून स्पा मालकाला पोलीस स्टेशन हजर राहण्यास सांगितले.
२६ डिसेम्बरला पुन्हा स्पा मालकाच्या विरुद्ध कारवाईची मागणी घेऊन श्रीराम सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून चांगलाच संताप व्यक्त केला,पोलिसांवर प्रश्नाचा भडीमार केला, यावेळी डीसीपी गणेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला, स्पा च्या आत काही अश्लील प्रकार घडल्याची माहिती मिळाली तर स्वतः कायदा हातात न घेता आधी पोलीसांना माहिती द्या, पोलीस स्वतः माहिती घेऊन कारवाई करणार अशा सूचना देण्यात आल्या , यावर शक्ती महाराज यांनी शहरातील स्पा विरुद्ध पोलिसांनी कारवाई नाही तर रस्त्यावर उतरणार असा इशारा दिला.