शेतातील मोटर पंप चोरणारे जेरबंद…

पिंपळखुटा, धामणगाव रेल्वे :- दिनांक २३/१२/२०२४ रोजी विलास मारोतराव सोनवणे वय ४८ वर्ष, रा. पिंपळखुटा यांनी तक्रार दिली की, त्यांचे शेतातील विहीरीतुन कोणीतरी अज्ञात इसमाने पानबुडी मोटरपंप किमंत ९०००/-रु चो चोरुन नेली आहे. अशा तक्रारीवरुन पो.स्टे. मंगरुळ दस्तगीर अप.क्र. ५५६/२०२४ कलम ३०३ (२) बि.एन.एस. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच अशा प्रकारचा गुन्हा पो.स्टे. मंगरुळ दस्तगीर अप.क्र. ५५८/२०२४ कलम ३०३ (२) बि.एन.एस. अन्वये गुन्हा नोंद होता.
मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद सा.(भा.पो.से.), अमरावती ग्रामीण यांनी शेतकऱ्यांचे शेतातुन पानबुडी मोटर पंप व केबल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामिण येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून कारवाई करण्याबाबत सुचना निर्गमीत केल्या होत्या.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात स्था.गु.शा., अम.ग्रा. येथील चांदुर रेल्वे उपविभागातील पो.उप.नि. मो. तस्लीम व त्यांचे पथक पोलीस स्टेशन मंगरुळ दस्तगीर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदारामार्फत खबर मिळाली की, ग्राम पिंपळखुटा येथे राहणारे
१) शुभम जगदीश भेंडे वय २९ वर्ष,
२) राजु गणपत केवत व्य ४२ वर्ष,
दोन्ही रा. पिंपळखुटा ता. धामणगाव रेल्वे जि. अमरावती यांचे कडे दोन मोटर पंप असुन ते विक्री करीता गावात विचारपुस केली आहे अशा माहितीवरुन त्यांना ताब्यात घेवून शुभम भेंडे यास गुन्हयासंबंधात विचारपुस केली असता त्यांनी त्याचा साथीदार राजु केवत याचेसह गुन्हा केल्याची कबुली दिल्यावरुन आरोपीचे ताब्यातुन
१) दोन पानबुडी मोटर पंप व केबल किमंत २१९८०/-रु
२) एक सुझुकी कंपनीची मोटर सायकल कि.अं. ६०,०००/-रु
३) एक मोबाईल किमंत १२०००/- रु असा एकुण ९३९८०/-रु चा मुद्देमाल नमुद आरोपीचे ताब्यातुन हस्तगत करण्यात आला.
नमुद आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाही करीता पो.स्टे. मंगरुळ दस्तगीर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत सा., अमरावती ग्रामीण, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री. किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. मोहम्मद तस्लीम, श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर, पोलीस अंमलदार मंगेश लकडे, सचिन मसांगे, दिनेश कनोजीया यांनी केली.