सदर पोलीसांची कामगिरी :- चोरी करणाऱ्या महिला आरोपीस अटक.

नागपूर :- नागपूर पोलीस ठाणे हद्दीतील साई ललीता अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ६४ वर्षीय जुलेका मोहम्मद अहमद यांच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी २५ डिसेंबर २०२४ रोजी नातेवाईकांच्या लग्नासाठी घरातून बाहेर गेल्या होत्या आणि त्यांनी त्यांचे सोन्याचे दागिने अलमारीमध्ये ठेवले होते. २९ डिसेंबर २०२४ रोजी घरकाम करणाऱ्या आस्मा हिने चोरी केल्याचा संशय घेऊन त्यांनी पोलीस ठाणे सदर येथे तक्रार दिली.
पोलिसांनी संशयित महिला आरोपीच्या विरोधात कलम ३०६ भा. द. वि. अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपास दरम्यान, पोलिसांनी आरोपी आस्मा अली (वय ४०, मंगळवारी, गड्डीगोदाम, गोवा कॉलोनी, नागपूर) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी तिची विचारपूस केली असता, तिने चोरी केल्याची कबुली दिली आणि आरोपीच्या ताब्यातून ३,२५,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. सदर अपराधाची माहिती वरिष्ठ पुलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी दिली
या कारवाईत पोलीस निरिक्षण मनिष ठाकरे, स पो नि. नितीन विटोले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. तसेच, सदर विभागातील पोलिस उप आयुक्त राहुल मदने आणि सहा. पोलीस आयुक्त श्रीमती सुनिता मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.