पोलीस ठाणे अजनी :- जिवानीशी ठार मारणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- दिनांक २६.१२.२०२४ चे १८.३० वा. ते दि. २७.१२.२०२४ चे ००.३० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे अजनी हद्दीत, अविनाश ग्राऊंडचे बाजुला, रोडचे कडेला फिर्यादीचा पती नामे कुलदीप रंजन चव्हाण वय ३६ वर्ष रा. प्लॉट नं. २१८, बेसा पावर हाऊस मागे, न्यू म्हाळगी नगर, नागपूर यांना त्याचा मित्र नामे आरोपी रिचेश दिपक शिक्कलवार वय ३४ वर्षे, रा. साईनगर नं. २, म्हाळगी नगर, हुडकेश्वर, नागपूर याने पैसे मागितले असता, फिर्यादीचे पतीने नकार दिल्याचे कारणावरून फिर्यादीचे पतीला मोटरसायकलवर सोबत नेवुन घटनास्थळी भांडण करून दगडाने फिर्यादीचे पतीचे डोक्यावर मारून त्यांना जिवानीशी ठार केले.
याप्रकरणी फिर्यादी श्रीमती श्रध्दा कुलदीप चव्हाण, वय ३२ वर्षे, रा प्लॉट नं. २१८, बेसा पावर हाऊस मागे, न्यू म्हाळगी नगर, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे अजनी येथे सपोनि. अल्लूरे ७५०७९६३१५३ यांनी आरोपीविरूध्द कलम १०३(१) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.