LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

मार्च पर्यंत रेल्वेच्या बऱ्याच गाड्या रद्द! जाणून घ्या माहिती

रेल्वे प्रवास आरामदायी आणि सोयीचा असल्याने भारतात करोडो लोक दररोज ट्रेनने प्रवास करतात. त्यामुळे भारतीय रेल्वेकडून हजारो गाड्या चालवल्या जातात. साधारणपणे जेव्हा लोकांना दूरवर कुठेतरी जावे लागते. त्यावेळी किफायतशीर आणि सुरक्षितता यासाठी सामान्यतः लोक रेल्वेने जाणे पसंत करतात. मात्र गेल्या काही काळापासून रेल्वेकडून होणाऱ्या अनेक समस्यांना प्रवासी सामोरे जात आहेत. रेल्वेने वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. अशावेळी आधीपासूनच रद्द झालेल्या गाड्यांबद्दल माहिती असेल तर पुढील प्रवासाची योजना आखता येते. त्यामुळे लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता पुढील माहिती फायद्याची ठरू शकते.

धुक्याच्या कारणापायी रद्द केल्या गाड्या

भारतात आता हिवाळा सुरू असल्याने थंडीच्या मोसमात भरपूर धुके असते. या धुक्यामुळे भारतीय रेल्वेच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे याही वेळी अनेक गाड्या रेल्वेने रद्द केल्या आहेत. धुक्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय रेल्वेने डिसेंबर ते मार्चपर्यंत अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. रद्द केलेल्या गाड्यांची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे.

गाडी क्रमांक १४६०६-०५ योगनगरी ऋषिकेश-जम्मुतावी एक्सप्रेस २६ डिसेंबर २०२४ ते २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक १४००३-०४ मालदा टाउन-दिल्ली एक्सप्रेस २६ डिसेंबर २०२४ ते १ मार्च २०२५ पर्यंत रद्द राहील.

गाडी क्रमांक १२२१०-०९ काठगोदाम-कानपूर साप्ताहिक एक्सप्रेस २६ डिसेंबर २०२४ ते २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत रद्द राहील.

गाडी क्रमांक १४६१६-१५ अमृतसर-लालकुआ एक्सप्रेस २६ डिसेंबर २०२४ ते २२ मार्च २०२५ पर्यंत रद्द राहील.

गाडी क्रमांक १४६१७-१८ बनमंखी-अमृतसर जनसेवा एक्सप्रेस २६ डिसेंबर २०२४ ते २ मार्च २०२५ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक १८१०३-०४ जालियनवाला बाग एक्सप्रेस २६ डिसेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत रद्द राहील.

गाडी क्रमांक १४५२४-२३ अंबाला-बरौनी हरिहर एक्सप्रेस २६ डिसेंबर २०२४ ते २७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत रद्द राहील.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!