Accident NewsLatest NewsNagpur
सोनेगाव तलावाच्या पायऱ्यांवर कार उलटली

सोनेगाव, नागपूर :- सोनेगाव तलावाजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे, मद्यपान केलेला एक कार चालकाचे कारवरील नियंत्रण गमावून कार तलावाच्या पायऱ्यांवर पलटी झाली. या अपघातात तीन तरुण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्वरित मदतीसाठी पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला सूचित केले. जखमींची स्थिती स्थिर असल्याची माहिती आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघाताच्या कारणांची तपासणी सुरू आहे, कदाचित चालकाने मद्यपान केल्याने अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, योग्य कारणांचा उलगडा लवकरच होईल, असे सांगितले आहे.