करीना थापाने मानले सिटी न्यूजचे आभार

अमरावती :- दिल्ली येथे 26 डिसेंबर ला राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारल्या नंतर करीनाचं अमरावतीत आगमन झाल. दुसऱ्या दिवशी 28डिसेंबर ला जय अंबा अपार्टमेंट चे सचिव नरेंद्र तायडे यांनी आमचे सिटी न्यूज कार्यालय गाठले. सिटी न्यूज चॅनल चे प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतीया यांना पेढे देऊन आभार मानले. सिटी न्यूज ने सर्व प्रथम दखल घेतल्याने .हे शक्य झालं. असं ते म्हणाले. यावेळी डॉ चंदू सोजतीया सह सर्व सिटी न्यूज परिवाराने पुष्पगुछ देऊन करीना थापा चे अभिनंदन केले. तिला भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. करीना थापा हिला विचारले असता तिने नरेंद्र तायडे यांच्या पाठपुरावा मुळे पुरस्कार मिळाला सोबतच सिटी न्यूज मुळे मी सर्वत्र प्रसिद्ध झाली. सर्वात आधी सिटी न्यूजवर वृत्त प्रसारित झाल्याने इतरांनी दखल घेतली..दिल्ली चा पुरस्कार मिळाला. मला भविष्यात बॉक्सर बनायचं आहे अशी प्रतिक्रिया करीना ने दिली आहे.