Amaravti GraminLatest News
धारणी तालुक्याला झोडपलं पावसाने, नागरिक हैराण

धारणी :- धारणी तालुक्यात मुसळधार पावसाने शनिवारी हजेरी लावली. या पावसाने शहर व ग्रामीणमधील जनजीवन विस्कळित झाले आहे तसेच शेतकरी चि चिंता व्यक्त केली आहे अचानक मुसळधार पावसामुळे धारणी कर हैराण झाले आहेत.
धारणी तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं. २७ व २८ तारखेला मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता तो खरा ठरलाय या पावसाने हातातोंडाशी आलेले पिकं गमवावी लागतील कि काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटतेय हरभरा गहू तूर शेतात आहे. पावसाने तुरीमध्ये कीड पडण्याची शक्यता आहे पावसाने धरणातील जनजीवन विस्कळीत झालंय .
हवामान विभागाने पावसाचा अंदाज आधीच सांगितलं होता जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये. २७ २८ ला पाऊस झाल्यानंतर २९ पासून थंडी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.