LIVE STREAM

Crime NewsLatest NewsMaharashtra

बदलापुरात 19 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाचा अत्याचार

बदलापूर :- बदलापूरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या मैत्रिणीने आधी तिला बियर पाजली आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर या मैत्रिणीच्या रिक्षाचालक मित्राने पीडितेवर अत्याचार केला.

पीडित तरुणी ही मुंबईला राहणारी असून ती 21 डिसेंबर रोजी बदलापूरला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता जाधव या तिच्या रिक्षाचालक मित्रालाही सोबत बोलावून घेतलं आणि या तिघांनी मद्यपान केलं. मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी शुद्धीत नसल्याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ता जाधव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

गुन्हा दाखल होताच 12 तासात आरोपीला अटक :-

पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेही या कृत्यात त्याची साथ दिली. पीडित तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिच्या हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी तिने 23 डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अवघ्या 12 तासात नराधम रिक्षाचालक दत्ता जाधव याला खरवई परिसरातून अटक ठोकल्या.

पोलिसांच्या भीतीने बहिणीच्या घरी लोखंडी कपाटात लपला होता नराधम :-

पोलीस ज्यावेळेस त्याला अटक करण्यासाठी गेले, त्यावेळेस पोलिसांच्या भीतीने तो बहिणीच्या घरातील लोखंडी कपाटात लपून बसला होता. मात्र पोलिसांनी अतिशय शिताफिने त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्या. तर त्याच्या या कृत्यात साथ देणाऱ्या त्याच्या मैत्रिणीलाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे.

लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न, मुलींच्या ओरडण्याने उघड पडण्याची भीती :-

पुण्यातील राजगुरुनगर म्हणजेच खेड तालुक्यातून एक संतापजनक प्रकार घडलाय. मुलीचे लैंगिक शोषण करत असताना तिच्या बहिणीच्या ओरडण्याने सर्व प्रकार उघडकीस येईल, या भीतीने पुण्यात 54 वर्षीय वृद्धाने दोन्ही मुलींची ड्रममध्ये बुडवून हत्या केली आहे. दरम्यान, मुली गायब असल्याने कुटुंबियांकडून त्यांचा शोध सुरु होता. पोलिसांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मात्र, मुलींचे मृतदेह आरोपी राहत असलेल्या रुममध्ये पाण्याच्या ड्रममध्ये सापडले. अजय चंद्रमोहन दास असं या मुलींची क्रूरतेने हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. दरम्यान, हे संतापजनक कृत्य केल्यानंतर आरोपीने परराज्यात पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, पुण्यातील हे प्रकरण कोर्टात फास्ट ट्रॅकवर चालवले जाणार असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. अटक केल्यानंतर आरोपी वरती गुन्हे देखील त्या पद्धतीचे दाखल केलेले आहे. यामध्ये आरोपीला फाशी मिळेल यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करणार असल्याचेही चाकणकर म्हणाले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!