विकृत तरुणाचा उच्छाद , वाहन चालकाला मारहाण

नांदेड :- एका विकृत तरुणाचा उच्छाद घालणारा व्हिडीओ वायरल झालाय. चालत्या चारचाकी वर चढून चालकाला मारण्याचा प्रयत्न त्याने केलाय. हे कार चालक डॉ प्रकाश नागरगोजे हे डॉक्टर आहेत. नागरगोजे यांचं लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे रुग्णालय आहे. नेहमी प्रमाणे ते चार चाकी वाहनातून हॉस्पिटला जातं होते. आयटीआय चौकात एका तरुणाने हॉर्न का वाजवत आहेत अस म्हणत गाडीच्या टॉपवर चढला आणि नागरगोजे यांना मारणार करण्यास सुरुवात केली. मारहाण सुरु असताना नागरगोजे यांनी वाहन घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहचले. एका चित्रपटात शोभण्यासारखं हे दृश्य होत. बघणाऱ्यानी येथे मोठी गर्दी केली होती.
एका तरुणाने डॉ च्या गाडीवर चढून त्यांना मारहाण केली. काहीही कारण नसताना डॉ ना मारहाण त्याने केली. चालत्या गाडीवर हा तरुण चढला अशावेळी त्याच बरं वाईट होऊ शकलं असतं तर जबाबदारी कुणाची ? ताज्या बातम्यांसाठी पहात रहा सिटी न्यूज.