एडिफाय शाळेत एडिस्पोर्ट वार्षिक क्रीडा संमलेनात विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण
अमरावती :- शहरात नामांकित असलेल्या चांदुरबाजार मार्गावरील एडिफाय स्कुल वतीने आयोजित केलेल्या वार्षिक क्रीडा सम्मेलनात अनेक खेळात अनेक विदयार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली , शाळेच्या मैदानावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून विविध खेळात विदयार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी पालकांकरिता सुद्धा शाळा प्रशासनाने खेळाचे आयोजन केले होते, सर्व विद्यार्थ्यांचे एडिफाय स्कुल चे संस्थापक समाजसेवक पुरणलाल हबलांनी यांनी कौतुक केले .
अमरावती जिल्ह्यातील नामांकित समजल्या जाणाऱ्या चांदुर बाजार मार्गावर असलेल्या एडिफाय शाळेत विदयार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एडिस्पोर्ट या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, क्रीडा महोत्सवात निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, शाळेचे संस्थापक अध्यक्ष तसेच देवी सोसायटी चे अध्यक्ष पुरणलाल हबलानीत्यांच्या पत्नी नम्रता हबलांनी, गोसी टोम्पे महाविदयालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र रामटेके, सिटी न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी अजय शृंगारे, शाळेचे प्राचार्य जेकब दास, संचालक रवी इंगळे आदी उपस्थित होते. मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी क्रीडा महोत्सवाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते एडिस्पोर्ट नावाने हवेत फुगे सोडून करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर पुरणलाल हबलांनी यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाची मशाल पेटवून विद्यार्थ्यांच्या हाती सोपवून विद्यार्थ्याने क्रीडांगणावर मशाल घेऊन मार्गक्रमण केले, क्रीडांगणावर शाळेचे नृत्य शिक्षक यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या शिव तांडव उत्कृष्ट नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले, यावेळी संस्था अध्यक्ष पुरनलाल हबलानी यांनी शपथ पत्राचे वाचन केले. शाळेच्या चारही हाऊस चे विद्यार्थी सह देवरणकर येथील एडिफाय शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पथसंचलन केले.
या पथसंचलन मध्ये अनेक चिमुकल्या विदयार्थ्यांनी सहभाग घेतला, या दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या आयोजनाबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरनावर त्यांचे कौतुक केले, शाळेचे अध्यक्ष पुरणलाल हबलानी यांनी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. क्रीडा आयोजनाचे उत्कृष्ट बाबत प्राचार्य सह सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले, क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी करिता शिवाराम कृष्णा सर, नृत्य शिक्षक भारत मोंढे सर, ममता ददलानी शीतल खोजरे मॅडम संगीता गावंडे भावना बारब्दे क्रीडा प्रमुख आनंद उईके सर प्राची किनाके अनुराग सिरसाठ ईशान कापडिया श्रुतिका अंबाडकर नीलिमा बाफना भाविका तलदा सागर मिसळकर आदी शिक्षकांनी मोलाचे परिश्रम घेतले.
वर्षभर ज्ञानाचे धडे गिरविण्याऱ्या विद्यार्थ्या करिता क्रीडा आयोजनाचे आयोजन करून त्यांच्या सुप्त गुणांना एडिफाय शाळेने वाव दिला, सोबतच पालकाच्या आनंदाकरिता त्याच्या साठी सुद्धा संगीत खुर्ची आदी खेळाचे आयोजन करून त्यांच्या आनंदात भर टाकली हे विशेष.