ऐकावं ते नवलच, शिक्षिकेनेच १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर केला लैंगिक अत्याचार, पुण्यातील विकृत घटन

पुणे :- पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र याच पुण्यात एक विकृत आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षिकेनेच दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिकेने 17 वर्षीय विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले असा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे, शाळेच्या आवारातच हा प्रकार घडलाय. विद्यार्थ्याच्या आईने तक्रार केल्यानंतर शिक्षिकेविरुद्ध खडक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका 27 वर्षीय शिक्षिकेवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत दहावीच्या वर्गात शिकतो. तर, आरोपी याच शाळेत शिकवते. घटनेच्या दिवशी पीडित विद्यार्थी शाळेत दहावीची पूर्व परीक्षा द्यायला आला होता. तेव्हाच शिक्षिकेने मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शाळेच्या आवारात त्याच्यावर लैंगिग अत्याचार केल्याचे समोर आले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेने तशी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या पोक्सोसह विविध कलामंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.