फूलगोभीला कवडीमोल भाव; शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट

बाजारात सध्या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामध्ये फूलगोभीसारख्या भाज्यांना मात्र कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. फुलगोभी उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत.
आंबेगाव येथील रामराव नांदेडकर यांनी एक एकर शेतीमध्ये फूलगोभीची लागवड केली होती. त्यांना दोन लाख रुपये उत्पन्न होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, बाजारात फुलगोभीला मिळत असलेल्या कवडीमोल भावामुळे त्यांचा सर्व खर्च देखील निघत नाही आहे. रामराव नांदेडकर अशी प्रतिक्रिया आमचे सिटी न्यूजचे नांदेड प्रतिनिधि मनोज मनपुर्वे यांच्याशी बोलताना दिली. आतापर्यंत 80 ते 90 हजार रुपये खर्च आला. फुलगोभी काढणीस आली तरीही त्यांना बाजारात फारसा भाव मिळत नाही. आता फुलगोभी जनावरांना खाऊ घालावी लागणार आहे.
या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची आवश्यकता आहे, जेणेकरून त्यांना किमान त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळू शकेल.