माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांची रॉक ठोक प्रतिकीर्या

बीड :- माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी आज शरद पवारांची भेट घेतली, त्यानंतर माध्यमांशी बोलताना बीडच्या घटनेवर आणि गुन्हेगारीवरती परखडपणे भाष्य केलं आहे. बीड चा प्रसंग अतिशय हृदयद्रावक आणि अतिशय भयानक अशी ती घटना घडली आहे. त्या ठिकाणी गेलो असता देशमुखांच्या कुटुंबासोबत भेट घेतली आहे. तिथे असणाऱ्या दोनशे तीनशे लोकांसोबत बोललो. बीडमध्ये अतिशय भयानक गुंडाराज आहे. जवळपास दोन ते अडीच हजार रिव्हॉल्वरचं लायसन्स त्या ठिकाणी आहे, कोणी एखादा टिप्पर वाला असेल त्याचा उद्घाटन करायचा असेल तर हवेत गोळीबार केले जातात. चौकामध्ये एखाद्याचा वाढदिवस असेल तर तरी गोळ्या झाडल्या जातात, अशी परिस्थिती बीडमध्ये आहे. अशी प्रखर प्रतिक्रिया आमदार उत्तमराव जानकर यांनी मध्यमाशी बोलताना दिली.
बीड प्रकरण प्रशासनासाठी आता आव्हान ठरते आहे, मुख्यमंत्र्यानी CID ला आदेश तर दिलेत, पण या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक कधी होणार, सरपंच संतोष देशमुख यांच्या हाटीएच नेमक कारण काय? हे प्रश्न मात्र आजही अनुत्तरीतच आहेत.