अवैध 2000 च्या नोटा बदलविणाऱ्या रॅकेटचा उलगडा
नागपूर शहरातील पोलिसांनी मोठ्या कारवाईत 2000 रुपयांच्या चलनात नसलेल्या नोटा बदलवण्याच्या अवैध रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. या रॅकेटमध्ये आरोपी अवैधपणे 2000 रुपयांच्या नोटा साठवून त्या बदलून 500 रुपयांच्या नोटा मिळवण्याचे काम करत होते. पोलिसाना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी मोरक्यासह 4 आरोपीना अटक केली असून मुद्देमालही जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. नागपूर शहरातील पोलिसांनी 2000 रुपयांच्या चलनात नसलेल्या नोटा बदलवण्याच्या अवैध रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. या रॅकेटमध्ये आरोपी 2000 रुपयांच्या नोटा अवैधपणे साठवून ठेवत होते आणि त्या नोटा बदलवून त्याबदल्यात 500 रुपयांच्या नोटा मिळवून देण्याचे काम करत होते. फिर्यादी पोलिस तपास पथकामध्ये कार्यरत असताना त्यांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, विधान भवन चौक जवळ स्थित आरबीआय बँकेच्या परिसरात एक ठेलावाला 2000 रुपयांच्या नोटा घेऊन आणि आधार कार्डासह ते त्या नोटा लोकांना देऊन, त्यांना बदलवून आणण्यास सांगत होता. त्याप्रकारे तो 20,000 रुपयांच्या 2000 च्या नोटा, 500 रुपयांच्या नोटांमध्ये बदलवून आणत होता. बदललेल्या नोटांवर तो आरोपी 300 रुपये प्रति व्यक्ती मोबदला घेत होता. या माहितीवरून पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि आरोपींच्या अंगझडतींमध्ये मोठ्या प्रमाणावर 500 रुपयांच्या नोटा आढळून आल्या, तसेच पोलिसांनी मोबाईल फोन जप्त केले. आरोपींच्या जवळून 2 लाखाचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी या प्रकरणाचा आणखी तपास केला असता, आरोपी अनिल जैन, जो मध्यप्रदेश राज्यातील जबलपूरचा रहिवासी आहे, त्याने अवैधपणे 2000 रुपयांच्या नोटा साठवून ठेवल्या होत्या. त्याच्या माध्यमातून आरोपींनी त्या नोटा अवैध पद्धतीने बदलवून घेतल्या. या प्रकरणी सखोल चौकशी करून पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, या रॅकेटमध्ये भाग घेत असलेले आरोपी 2000 रुपयांच्या नोटांमध्ये करण्यात आलेली फसवणूक आणि शासकीय मार्गाने त्यांना बदलवण्याच्या दिशेने साठवलेली संपत्ती न्यायाधिकाराच्या कक्षेत घेऊन कार्यवाही करत आहेत.
केंद्र शासनाने बंद केलेल्या चलनात नसलेल्या नोटांबद्दल अजूनही काही प्रमाणात लोकांमध्ये भ्रम आहे. त्यामुळे खोट्या अफवांना ते सहज बळी पडतात. फसवणूक होण्याच्याही घटनांमध्ये वाढ झालेली आहे, प्रशासन या सर्व प्रकरणांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो तर आहेच, मात्र सामान्य नागरिकांनी सुद्धा सावध राहण्याची आवश्यकता आहे.